Pune Accident : खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू

खडकवासला धरणाजवळ रस्त्यावर दुचाकी खड्ड्यात आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला.
death
deathSakal

पुणे - खडकवासला धरणाजवळ रस्त्यावर दुचाकी खड्ड्यात आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. प्रसाद गोविंद करंजावणे (वय ३१, रा. भुकूम, ता. मुळशी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.

या अपघातात त्यांचे वडील गोविंद दगडू करंजावणे (वय ६५) जखमी झाले आहेत. दुचाकीस्वार प्रसाद आणि त्यांचे वडील गोविंद खडकवासला धरण रस्त्यावरून सायंकाळी एनडीए रस्त्याकडे निघाले होते. धरण रस्त्यावरील पुलापासून ५० मीटर अंतरावर खड्ड्यात दुचाकी आदळून दोघे खाली पडले.

या अपघातात दुचाकीस्वार प्रसाद यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान प्रसाद यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com