लिफ्टच्या डक्‍टमधून खाली पडल्याने तरूणाचा मृत्यू 

Young man dies after falling of lift duct in pimpri
Young man dies after falling of lift duct in pimpri

पिंपरी : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील लिफ्टच्या डक्‍टमधून खाली पडल्याने तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना ताथवडे येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
प्रजेन बुधीराम बोरो (वय 25) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी मोमाई कन्स्ट्रक्‍शनचा मालक दिपेश उकाने याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ताथवडे येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

Video : अजित पवार हात जोडून करताहेत नमस्कार; कारण...

30 जानेवारीला सायंकाळी चारच्या सुमारास बोरो हे येथे काम करीत असताना या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील लिफ्टच्या डक्‍टमधून ते खाली पडले. यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, दिपेश उकाने याने कामगारांच्या सुरक्षिततेबाबत हलगर्जीपणा करीत लिफ्टच्या डक्‍टमध्ये सुरक्षा जाळी लावली नाही, तसेच ते बंद करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे बोरो यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी उकाने याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत. 
पुणे : चुलत भावाच्या लग्नाला बोलावले नाही म्हणून.... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com