नीरा नदीत तरुण बेपत्ता; शोधकार्य सुरु

riv.jpg
riv.jpg

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील साऱोळा (ता. भोर) येथील नीरा नदीवरील पुलावरुन रात्री एकच्या सुमारास एक तरुण नदीत पडला असून, शिवरळ पोलिस व महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्याकडून नदीमध्ये शोधकार्य सुरु आहे. दशरथसिंग अमरसिंग सिंग (वय 18, राजस्थान) असे पाण्यात बेपत्ता तरुणाचे नाव आहे.

शिरवळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिर शिंदे म्हणाले की, दशरथसिंग त्याचा भाऊ व मित्रांसमवेत कारमधून बेंगलोरला निघाला होते. मंगळवार (ता.11 रोजी) रात्री एकच्या सुमारास त्यांची कार नीरा नदीच्या पुलावर सातारा जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताना शिरवळ येथील चेकनाक्यावर थांबली होती. दशरथसिंग यास उलटी होत असल्याने त्याने उतरुन गाडीमागे जाऊन नदीच्या पुलाच्या कठड्याजवळ उलटी करत होता, तो परत आला नाही म्हणून कारमधील त्याचा भाऊ व मित्रांनी त्याचा शोधाशोध सुरु केला. त्या वेळी त्याची चप्पल नदीच्या पाण्यावर तरंगताना दिसली. तो कठड्यावरुन नदीच्या पाण्यात पडल्याची शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

या बाबत बेपत्ता तरुणाचा भाऊ दिपसिंग याने शिरवळ पोलिसांना याबाबत खबर दिली. त्याने दिलेल्या माहीतीनुसार नदीच्या पाण्यात दशरथसिंग याचा शोध घेण्यात येत आहे.
नीरा नदीला खुप पाणी असून, वीर धरण भरल्याने धरणाचा फुगवट्यामुळे नदीपात्र विस्तीर्ण भरले आहे. एवढ्या मोठ्या पाण्यात बुडालेल्या तरुणाचा शोध घेणे अवघड असल्याने शिरवळ पोलिसांनी या कामात महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांची मदत घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com