दगडखाणीमध्ये एका युवकचा दगडाने ठेचून खुन

अंनत काकडे
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

चिखली : शेलावस्ती येते एका चाळीस वर्षीय इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह सुमारे शंभर फुट फरपटत नेऊन साठ फुट खोल खाणीत फेकून देण्यात आले. शुक्रवारी सांयकाळी हा प्रकार उघडकिस आला. विजय प्रल्हाद सोळंके (वय. 40 रा. भांगरे कॉलनी चिखली, मुळ रा. वाशिम) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत निगडी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून, खूनाच्या तपासासाठी तीन व्यक्तीना ताब्यात घेण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सोळंके हे मजूरीचे तसेच ठेकेदारीवर छोटी कामे करत होते. गुरवारी कामावर गेल्यानंतर ते रात्री घरी परतले नाहीत. घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने शुक्रवारी सकाळी पोलिसांकडे पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. दरम्यान शुक्रवारी सांयकाळी शेलारवस्ती येथे इंद्रायणीनदी परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यांना खाणीच्या बाजूला असलेल्या सिमाभिंती जवळ खाणीच्या दिशेने काही तरी ओढत नेल्याच्या खुना आणि गवतावर रक्त सांडलेले दिसले. गुराख्यांनी रक्ताच्या दिशेने मार्ग काढला असता त्यांना खाणीत पाण्यामध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिसला.

दरम्यान हा प्रकार पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधीपक्षनेते दत्ता साने यांना कळविण्यात आला. साने यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिस व आग्निशामक दलाला बोलावून घेतले. मात्र, खाण खोल आणि पाण्याने भरलेली असल्याने मृतदेह काढताना अडचणी येत होत्या. आग्निशाक दलाला बोटीच्या सह्याने रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर विजय यांच्या पत्नीचा बोलावून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. पुढील तपास निगडी पोलिस करत आहेत. 

Web Title: A young man murdered by stone