भाईगिरी करणार्‍यांकडून तरुणावर कोयत्याने वार; एकाला अटक

मित्रांकडे खंडणी मागू नका, असे सांगितल्याच्या कारणावरुन एका टोळक्याने तरुणावर कोयत्याने, दगडाने मारहाण करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला अटक केली.
Crime Arrested
Crime ArrestedCrime
Summary

मित्रांकडे खंडणी मागू नका, असे सांगितल्याच्या कारणावरुन एका टोळक्याने तरुणावर कोयत्याने, दगडाने मारहाण करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला अटक केली.

कॅन्टोन्मेंट - मित्रांकडे खंडणी मागू नका, असे सांगितल्याच्या कारणावरुन एका टोळक्याने तरुणावर कोयत्याने, दगडाने मारहाण करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला अटक केली असून, पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना खडकमाळ आळीतील सेंट टेरेसा चर्चसमोर व अलका चित्रपटगृहाजवळ सोमवारी पहाटे सव्वा दोन वाजता घडला.

याप्रकरणी गौरव सुरेश कांबळे (वय २५, रा. गंज पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन श्रीनाथ ऊर्फ टीक्या शेलार, गणेश कोळी, कुणाल जाधव, विपुल इंगवले, प्रणव माने (सर्व रा. खडकमाळ, घोरपडी पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, कुणाल जाधव याला अटक केली आहे. हे सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. फिर्यादीचे मित्र लखन रेवचंदाणी व मृणाल कांबळे यांना आरोपी फोन करुन खंडणी स्वरुपात पैशांची मागणी करत होते. पैसे न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी देत असत. तेव्हा फिर्यादी गौरव याने आरोपीला त्यांचे मित्राना पैसे मागू नका, असे सांगितल्यामुळे ते सर्व आरोपी फिर्यादीवर खुन्नस ठेवून होते. गौरव कांबळे हा खडकमाळ आळीतील चर्चसमोर असताना आरोपींनी त्यांना गाठले. तुला लय दिवस शोधत होतो, आता भेटला आहेस. तुला सोडणार नाही. तुला खल्लासच करतो, असे म्हणून श्रीनाथ शेलार याने कोयत्याने मारहाण केली. गणेश कोळी याने दगडाने मारहाण केली. तसेच फिर्यादीचा मित्र मृणाल याच्या डोक्यात मारण्यासाठी कोयता उगारुन त्याचे हातावर वार केला. इतरांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीची दुचाकी व मित्र लखन रेवचंदाणी याची दुचाकी जबरदस्तीने चोरुन नेले. पोलीस उपनिरीखक खंडाळे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com