दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातुन तरुणावर तलवारीने वार

येरवडा परिसरात रागातुन एकाने तरुणावर तलवारीने केले वार.
Attack
Attacksakal
Summary

येरवडा परिसरात रागातुन एकाने तरुणावर तलवारीने केले वार.

पुणे - दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केल्यानंतरही पैसे न दिल्याच्या रागातुन एकाने तरुणावर तलवारीने वार करुन त्याच्या खिशातील तीन हजार रुपयांची रोकड काढून घेतली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला. येरवडा पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे. हि घटना गुरुवारी पहाटे नऊ वाजण्याच्या सुमारास येरवडा परिसरात घडली.

अभिजीत ऊर्फ चड्डीभैय्या रमेश शिंदे (वय 19, लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी माजीद शेख (वय 21, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माजीद हा मंडप व लग्नसोहळ्यात सजावट करण्याचे काम करतो. नेहमीप्रमाणे तो गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याचे मंडप लावण्याचे काम संपल्यानंतर येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरातुन त्याच्या घरी जात होता. त्यावेळी अभिजीत शिंदे याने फिर्यादीस अडविले.

त्यावेळी त्याने फिर्यादीकडे नशापाणी करण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यास पैसे देण्यास फिर्यादीने नकार दिला. त्यावेळी त्याने फिर्यादीस शिवीगाळ केली. त्यावेळी त्याने फिर्यादीस पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत, त्यांच्या पॅंटच्या खिशातील तीन हजार रुपयांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. केवळ तेवढ्यावरच न थांबता त्याच्याकडील तलवारीने फिर्यादीच्या डोक्‍यात घाव घातले. तसेच त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या घटनेत फिर्यादी गंभीर जखमी झाले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com