Uddhav Thackeray News: राज यांच्या भाषणावर उद्धव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया; म्हणाले, तीच रेकॉर्ड घासून पुसून…

Latest Marathi News: गुढी पाडव्यानिमित्त मुंबईत शिवाजीपार्कवर मनसेचा पाडवा मेळावा पार पडला.
Uddhav Thackeray and Raj Thackeray News
Uddhav Thackeray and Raj Thackeray News
Updated on

Uddhav Thackeray News: गुढी पाडव्यानिमित्त मुंबईत शिवाजीपार्कवर मनसेचा पाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली, या भाषणात अनेक आरोप करण्यात आले आहेत.

दरम्यान यानंतर आता कालच्या या भाषणावर उद्धव ठाकरे यांनी त्यांना जशी स्क्रिप्ट आली तशी त्यांनी वाचली अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

कालच्या सभेच राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यांविषयी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, मला कालची भाषणं पण आणि गेल्या १८ वर्षापासू तीच रेकॉर्ड घासून पुसून चालली आहे, यावर माझं भाष्य गेल्या वर्षी १४ मेल बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या सभेत मांडलं होतं. (Latest Marathi News)

तेव्हा एका चित्रपटाचा दाखला दिला होत. तोच तुम्ही पुन्हा बघू शकता असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

हेही वाचा - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Uddhav Thackeray and Raj Thackeray News
Osho Ashram Pune : पुण्यातील ओशो आश्रमाबाहेरचं आंदोलन भोवल! १२५ आनुयायांवर गुन्हा दाखल

राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात माहीमच्या समुद्रात अवैध दर्गा बांधला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होत. यानंतर आज ते अवैध बांधकाम हटवण्यात आलं. (Marathi Tajya Batmya)

यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ते बांधकाम काही नवीन नव्हतं. इथं दुसऱ्या पक्षाचे तसेचं त्यांच्या पक्षाचे आमदार, नगरसेवक होते. त्याच्या अधिपासून ते बांधकाम होतं.

Uddhav Thackeray and Raj Thackeray News
Pune Crime News : पुण्यातील पेठेत कोयत्याचा थरार! भरदिवसा व्यापाऱ्याचे ४७ लाख लुटले

जशी स्क्रिप्ट आली तशी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल जाहीर सभेत माहिम समुद्र किनारी होत असलेल्या या अनधिकृत बांधकामाकडे सरकारचं लक्ष वेधलं. त्यानंतर लगेचच रात्रीत कारवाईचे आदेश देण्यात आले आणि सकाळ-सकाळी लगेचच या पाडकाम करण्यात आले.

राज ठाकरे यांच्या भाषणानंतर झालेल्या या कारवाईवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांना जशी स्क्रिप्ट आली असेल तसं त्यांनी वाचलं असेल.

नाहीतर इतके वर्ष कारवाई होत नाही, आणि तातडीने कारवाई होते. तर राज्यात अनेक गोष्टी आहेत त्या त्यांना कळवा ते पत्र लिहीतील आणि कारवाई होईल असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.