

दत्तवाडी परिसरात काही तरुणांनी कोयते हवेत फिरवत एकाच्या डोक्यात कोयत्याने वार केले.
पुणे - दत्तवाडी परिसरात काही तरुणांनी कोयते हवेत फिरवत एकाच्या डोक्यात कोयत्याने वार केले. ही घटना सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलावर गुरुवारी (ता. २६) रात्री सव्वादहा वाजता घडली.
आकाश गायकवाड (वय २२, रा. जनता वसाहत) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. फिर्यादी आकाश याचा भाऊ सुमीत याला धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून या टोळक्यातील तरुणांना जाब विचारला. त्यावरून चार तरुणांनी मिळून आकाशला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच, तू येथील भाई आहेस का, असे विचारत आकाशच्या डोक्यात कोयत्याने वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी शहरात कोयता गॅंगवर कठोर कारवाई सुरू केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कोयता गॅंगमधील काही टोळक्यांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. मात्र, दत्तवाडी परिसरात झालेल्या या घटनेवरून कोयता गॅंगची दहशत अद्याप सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.