जमिनीच्या वादातून थोरल्याने केले धाकट्या भावाचे घर उध्वस्त

दत्ता म्हसकर
बुधवार, 16 मे 2018

जुन्नर - मोठ्या भावाने लहान भावाच्या राहत्या घराची मोडतोड करून ते जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र विधाटे यांची पत्नी वनीता, मुलगा स्वप्नील व भावजय 13 मे रोजी नातलगांच्या लग्नकार्यासाठी सांगली येथे गेले होते.14 मे रोजी राजेंद्र घरात एकटेच असताना मोठा भाऊ लक्ष्मण व त्याचा मुलगा तुषार यांनी रात्रीच्या वेळी राजेंद्रला मारहाण केली. त्यानंतर पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तिंच्या मदतीने घरातील वस्तूंची मोडतोड करून त्या बाहेर फेकून दिल्या. तसेच सामानाची नासधूस केली.

दरम्यान, घरातील कपाटात असलेली दोन लाख दहा हजार रूपयांची रक्कम हरवली असल्याचे नमूद केले आहे. हल्लेखोरांनी घराच्या बाहेर असलेल्या शौचालय व स्नानगृहाची फोडतोड केली. नंतर अज्ञात व्यक्तिंच्या मदतीने राजेंद्र यास जबरदस्तीने क्रुझर गाडीत बसवून देविभोईर फाटा येथे नेले व नंतर कारखानाफाटा येथे आणून सोडून दिले. त्याचप्रमाणे राजेंद्र यांचा लहान भाऊ संजय मनोरूग्ण असून, त्याला जबरदस्तीने गाडीत बसवून पुणे नाशिक महामर्गावर 14 नंबर येथे सोडून देण्यात आले. या घटनेबाबत राजेंद्र ज्ञानदेव विधाटे (वय51) यांनी त्यांचा मोठा भाऊ लक्ष्मण ज्ञानदेव विधाटे, तुषार लक्ष्मण विधाटे, उत्तम मंडलीक, अनिल कानडे यांच्या नावे जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या घटनेचा अधिकचा तपास जुन्नरचे पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे करत आहेत. 

Web Title: The younger brother's house collapsed due to land dispute