आईने पाहिले शेततळ्यात बुडालेले काळजाचे दोन तुकडे

विनायक चांदगुडे
Thursday, 6 August 2020

निरगुडे येथील केकाण वस्तीजवळ मिसाळ कुटुंबिय वास्तव्यास आहे. या कुटुंबातील दीपाली व मुलगा कृष्णा हे काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खेळत खेळत घरासमोरील तळ्याजवळ गेले होते.

शेटफळगढे (पुणे) : इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथील शेततळ्यात बुडून लहानग्या बहिण- भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीपाली चंद्रभान मिसाळ (वय १२) व मुलगा कृष्णा चंद्रभान मिसाळ (वय ८), अशी त्यांची नावे आहेत. 

प्रत्येक बारामतीकराची आजपासून होणार तयारी

भिगवण पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निरगुडे येथील चंद्रभान मिसाळ यांची मुलगी दीपाली व मुलगा कृष्णा हे बहिणभाऊ काल खेळत खेळत शेततळ्याकडे गेले व खेळण्याच्या नादात दोघेही पाण्यात पडले. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत मुलांच्या आई रेणुका मिसाळ यांनी भिगवण पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

न्यायालयात केवळ तत्काळ प्रकरणांवर सुनवाई

निरगुडे येथील केकाण वस्तीजवळ मिसाळ कुटुंबिय वास्तव्यास आहे. या कुटुंबातील दीपाली व मुलगा कृष्णा हे काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खेळत खेळत घरासमोरील तळ्याजवळ गेले होते. तेथे पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत शेजारच्या शेतकऱ्याने मिसाळ दांपत्याला माहिती दिली. त्यानंतर या भावंडांच्या आईने पाहिले असता दिपाली व कृष्णा पाण्यात पडलेले दिसले. त्यांना तेथील जमलेल्या ग्रामस्थांनी पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर भिगवण  येथील दवाखान्यात या दोघांना आणले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून ते मयत झाले असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरिक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संदिप कारंडे हे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Younger sister-brother dies after drowning in pond at Indapur