साठीपार केलेले तरुण करणार श्रीनगर ते लेह सायकल राईड

टिमच्या १६ सदस्यांपैकी ११ सदस्य साठीपेक्षा जास्त वयाचे आहेत. तर सर्वात कमी वय असलेले सदस्य हे ३१ वर्षांचे आहेत.
Cycle Ride
Cycle RideSakal

पुणे - हौसेला मोल नसते तसेच जिद्दीला वय नसते, असेच काहीसे पुण्यातील यंग सिनिअर्सची टीमने (Young Senior Team) आयोजित केलेल्या सायकल रार्इडमध्ये (Cycle Ride) सहभागी झालेल्या सदस्यांच्या वयाकडे पाहून म्हणावे लागले.

टिमच्या १६ सदस्यांपैकी ११ सदस्य साठीपेक्षा जास्त वयाचे आहेत. तर सर्वात कमी वय असलेले सदस्य हे ३१ वर्षांचे आहेत. त्यांच्या टीमध्ये तीन महिला सदस्यांचाही समावेश आहे. श्रीनगर ते लेह आणि नंतर खारदुंगला अशी महत्वाकांक्षी आणि आव्हानात्मक सायकल राईड टीमने आयोजित केली आहे. आज (ता. ७) सकाळी सात वाजता पुणे विमानतळावर एकत्र येऊन ही टिम श्रीनगरला रवाना होणार आहे. तेथून नऊ ऑगस्ट रोजी त्यांचा प्रवास सुरू होर्इल. सुमारे ४५० किलोमीटरचा प्रवास करून १६ ऑगस्ट रोजी टिम खारदुंगला येथे पोहोचणार आहे.

Cycle Ride
पुणे महापालिकेत समाविष्ट ९ गावे झिकाबाबत अतिसंवेदनशील; यादी जाहीर

या मार्गे करणार प्रवास :

श्रीनगर, सोनमर्ग, द्रास, कारगिल, जोजिला पास, लामायुरू, आल्ची, लेह आणि खारदुंगला  

सायकल मोहिमेतील सदस्य :

संजय कट्टी, अविनाश मेढेकर, दत्तात्रेय गोखले, विजय हिंगे,  मोनिश चक्रवर्ती, देवदत्त टेंबेकर, डॉ. सुभाष कोकणे, डॉ. सुरेखा कोकणे, अनिरुद्ध पटवर्धन, गौरी पटवर्धन, शिरीष लोणकर, पद्माकर आगाशे, गौतम भिंगनिया, अरविंद चितळे, स्मिता पंढरी, सुनील दहिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com