तुमचा हॅंड सॅनिटायझर सुरक्षित आहे का?, वाचा सविस्तर

तुमचा हॅंड सॅनिटायझर सुरक्षित आहे का?, वाचा सविस्तर

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपण सर्वजण वेळोवेळी हॅंड सॅनिटायझरचा वापर करत आहे. पण, तुम्ही वापरत असलेला सॅनिटायझर सुरक्षित आहे का, त्यामुळे हातावर जखमा तर होत नाही ना, लहान मुलांना तर त्याचा त्रास होत नाही ना? त्याचाच घेतलेला हा आढावा. 

-हॅंड सॅनिटायझर म्हणजे काय? 
हातावरील जिवाणू आणि विषाणूंना एका मिनिटात नष्ट करणारा अल्कोहोल बेस्ड द्रव म्हणजे हॅन्डसॅनिटायझर. 

-हॅंड सॅनिटायझरमधील घटक कोणते ? 
इथेनॉल किंवा इतर अल्कोहोल बेस्ड रसायन (80 टक्के), ग्लिसरॉल (1.45 टक्के), हायड्रोजन पेरॉक्‍साईड (0.125) आदी 

-निकृष्ट सॅनिटायझक कसे ओळखाल? 
सॅनिटायझरमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात अल्कोहोल असेत. त्यामुळे हातावर घेतल्यानंतर काही वेळातच ते उडून जायला (इव्हॉपरेट) सुरवात व्हायला हवी. तसेच, प्रत्यक्ष प्रयोगातून तपासण्यासाठी एका टिश्‍यू पेपरवर "बॉलपेन'ने छोटे वर्तुळे तयार करा. त्यावर प्रमाणात हॅन्ड सॅनिटायझर टाका, जर पेनानी तयार केलेल्या वर्तुळातील शाई जास्तच पसरली, तर समजायचे तुमचे सॅनिटायझर चांगल्या दर्जाचे नाही. 

-सॅनिटायझरमध्ये भेसळ का होते? 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जगभरातील लोकांनी सॅनिटायझर वापरायला सुरवात केली. देशातही प्रथमच लोकांनी इतक्‍या मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझर वापरला. उत्पादनाच्या तुलनेत मागणी प्रचंड असल्याने उत्पादकांनी भेसळयुक्त सॅनिटायझर बाजारात आणले आहे. अन्न व औषध प्रशासनाने मुंबई, दिल्ली आदी शहरांत यासंबंधी छापे टाकून बनावट सॅनिटायझर जप्त केले आहे. 

-सॅनिटायझरमुळे त्रास होऊ शकतो का? 
सॅनिटायझरचा अति वापर चिंताजनकच आहे. तसेच पाच वर्षाखालील मुलांनाही याबबत जपायला हवे. शक्‍यतो सॅनिटायझर पोटात जात नाही. पण बनावट सॅनिटायझर असल्यास आणि तो वेळेत उडून न गेल्यास पोटात जाण्याची शक्‍यता असते. त्यामुळे कदाचित त्रास होऊ शकतो. 

-लहानग्यांमध्ये गॅस्ट्रोएन्टेरिटिसचा धोका? 
निकृष्ट दर्जाच्या सॅनिटायझर, वातावरणातील बदल आणि शिळे अन्न यामुळे पाच वर्षाखालील विशेषतः सहा महिन्यापर्यंतच्या मुलांमध्ये या आजाराची शक्‍यता अधिक असते. 

-गॅस्ट्रोएन्टेरिटिस चे लहानग्यांवरील परिणाम? 
ओटीपोटात वेदना, सैल हालचाली, उलट्या ताप, भूक न लागणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, सूजलेले डोळे, मलामध्ये रक्त 

-काय काळजी घ्याल? 
उत्कृष्ट दर्जाचा सॅनिटायझर वापरा. पालेभाज्या, फळे स्वच्छ धुवा. पिण्यासाठी उकळलेले पाणी वापरा 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुलांमध्ये अतिसार व उलटी होत असल्याने त्यांच्या शरीरातील पाणी कमी होते. यातून अशक्तपणा वाढू शकतो. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींसह हात धुण्याच्या पद्धती आणि साधनांकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. 
-डॉ. अंशु सेठी, बालरोगतज्ज्ञ, अपोलो क्‍लिनिक

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com