
किरण आणि अभिषेक हे दोघे मित्र असून अभिषेकची गर्लफ्रेंड ही किरणची मानलेली बहीण आहे.
पिंपरी : प्रेमसंबंधाच्या कारणावरून एकाने मित्रावर प्राणघातक हल्ला केला. गळ्यावर कटरने वार केल्याने मित्र गंभीर झाल्याची घटना भोसरी येथे घडली.
अभिषेक ऊर्फ आकाश मधुकर कांबळे (वय 26, रा. पावर हाऊस जवळ, बालाजीनगर झोपडपटटी, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर किरण शिवाजी थोरात (वय 23, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शुभम मधुकर कांबळे (वय 20, रा. बालाजीनगर झोपडपटटी, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
- 'होम मिनिस्टर'चा राग काढण्यासाठी गृहमंत्र्यांची येरवडा जेलमध्ये पैठणी खरेदी
शुक्रवारी (ता.1) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास जखमी अभिषेक आणि त्याचा आरोपी मित्र किरण हे दोघेजण अभिषेक याच्या दुचाकीवरून भोसरी एमआयडीसीतील इंद्रायणीनगरकडून बालाजीनगरकडे जात होते. त्यावेळी प्रेमसंबंधाच्या कारणावरून किरण याने अभिषेक याचा कटरने गळा कापला. यामध्ये अभिषेक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी किरण याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.
- औरंगाबादनंतर आता पुण्याच्या नामांतराची मागणी
किरण आणि अभिषेक हे दोघे मित्र असून अभिषेकची गर्लफ्रेंड ही किरणची मानलेली बहीण आहे. अभिषेकचे आणि बहिणीचे प्रेमप्रकरण किरणला माहित होते, पण गेल्या काही दिवसांपासून अभिषेकचे त्याच्या गर्लफ्रेंडसोबत सतत भांडण होत होते, त्यामुळे अभिषेक आणि किरण यांच्यातही खटके उडत होते, याचा त्रास होऊ लागल्याने किरणने हे पाऊल उचलले. या प्रकरणाचा अधिक तपास एमआयडीसी भोसरी पोलिस करीत आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)