Crime News : मारहाण करत तरुणाच्या डोक्यात घातला दगड

तरुणाला मारहाण करत डोक्यात दगड घातल्याची घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील इराणी गल्ली परिसरात रविवारी रात्री घडली.
Beating
BeatingSakal

उरुळी कांचन - एका तरुणाला मारहाण करत डोक्यात दगड घातल्याची घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील इराणी गल्ली परिसरात रविवारी (ता. १८) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. अब्बास इराणी (रा. इराणी गल्ली, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी शादाब नजीब इनामदार (वय १८, रा. पठारे वस्ती कदमवाकवस्ती, तालुका हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्बास इराणी हा शादाब इनामदार यांना वारंवार शिवीगाळ करत होता. रविवारी (ता. १८) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास इनामदार घरी जात असताना इराणीने पुन्हा शिवीगाळ केला.

शादाब यांनी 'शिवीगाळ का करतोस'? असं विचारलं असता इराणीने त्यास मारहाण करण्यास सुरवात करून डोक्यात दगड घातला. त्यात इनामदार जखमी झाले. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com