व्याजाच्या पैशांवरून मारहाण केल्यामुळे तरुणाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

youth  suicide

व्याजाच्या पैशांवरून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केली.

Pune Crime : व्याजाच्या पैशांवरून मारहाण केल्यामुळे तरुणाची आत्महत्या

पुणे - व्याजाच्या पैशांवरून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना फुरसुंगी भेकराइनगर येथील पापडे वस्तीमध्ये घडली.

वैभव प्रकाश सूर्यवंशी (वय ३६, रा. सहजीवन सोसायटी, भेकराईनगर, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वैभव यांची पत्नी स्नेहल सूर्यवंशी (वय ३०) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अतुल बाबासाहेब सूर्यवंशी (वय ३५, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव याने आरोपी अतुल याच्याकडून दोन वर्षांपूर्वी व्याजाने पैसे घेतले होते. ही रक्कम शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. दरम्यान, अतुलने व्याजाचे पैसे परत करण्यावरून वैभवला शिवीगाळ करून मारहाण केली होती. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून वैभवने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तृप्ती खळदे करीत आहेत.