दुचाकी व टेंपोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

लोणावळा - मित्राचा वाढदिवस साजरा करून परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. 

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा कोहिनूर पॅलेससमोर गुरुवारी (ता. २६) रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकी व टेंपोची धडक झाली. यात शुभम वाल्मीक मोरे (वय २६, रा. जालना) याचा जागीच मृत्यू झाला. त्याचे दोन मित्र शुभम विलास जाधव (वय २०, सध्या रा. दत्तवाडी, कुसगाव बु., मूळ हिंगोली), विक्की दयानंद वाघमारे (वय २२, सध्या रा. दत्तवाडी, मूळ चेंबूर, मुंबई) जखमी झाले आहे. 

शुभम शिकत असलेल्या सिंहगड महाविद्यालयातील दर्शन सिरोया, हृषीकेश देशमुख या मित्रांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी २० ते २५ जण खोपोलीला गेले होते. तेथुन लोणावळ्याकडे परतताना शुभमच्या दुचाकीची (एमएच ०१ एझेड ०५०७) समोरून येणाऱ्या टेंपोला (एमएच १४ बीएम २७४२) जोरदार धडक बसली. त्यात शुभमच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यासह अन्य दोन जखमींना लोणावळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, शुभम मोरे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. शुभम जाधव व विक्की वाघमारे यांच्यावर लोणावळ्यात उपचार सुरू आहेत. सुनील शेडगे (वय २०, रा. सिंहगड हॉस्टेल) यांनी पोलिसांत खबर दिली.

Web Title: youth death in two wheller and tempo accident