हडपसर येथील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

कृष्णकांत कोबल
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

मांजरी : बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी (ता.22) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अमनोरा मॉलच्या पाठीमागील डीपी रोडवर तुपे कॉर्नर जवळ हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला.

सचिन यादवकुमार (वय- 18, रा. माळवाडी, हडपसर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर उमेश शिवाजी रेड्डी (वय- 17, रा. माळवाडी, हडपसर) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन व उमेश हे दुचाकीवरून तुपे कॉर्नर येथील डीपी रोडवरून सिझन मॉलकडे निघाले होते. त्यावेळी मागून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात सचिनचा जागीच मृत्यू झाला तर उमेशच्या पायाला दुखापत होऊन तो जखमी झाला आहे.

अपघातानंतर डंपर चालकाने डंपर सोडून पळ काढला आहे. दरम्यान घटनास्थळी उपस्थित झालेल्या संतप्त नागरिकांनी डंपर पेटवून दिला. हडपसर पोलिसांनी डंपर चालकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सचिन यादवकुमार हा साधना विद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत होता, तर जखमी झालेला उमेश फुरसुंगी येथील न्यु इंग्लिश स्कुल मध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. 
 
Web Title: youth died on road accident