पुण्यात भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

वैभवराज हा त्याचा मित्र ऋत्विक जैन यांच्यासमवेत शुक्रवारी पहाटे सव्वा एक वाजता नवीन कात्रज बोगद्याजवळ येथून पुण्यात येत होते. वैभवराज हा दुचाकी वेगात चालवित होता. त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे गाडी घसरली. त्यानंतर गाडी दुभाजकावर आदळल्याने  तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

पुणे : भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर आदळून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे सव्वा एक वाजता नवीन कात्रज बोगद्याजवळ घडली.

वैभवराज बिपिनकुमार (वय 19, रा. समर्थनगर, न्रहे) असे अपघातात मृत्युमुखी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुफियान मुजाहिद (वय 24, रा. खेड शिवापुर) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभवराज हा त्याचा मित्र ऋत्विक जैन यांच्यासमवेत शुक्रवारी पहाटे सव्वा एक वाजता नवीन कात्रज बोगद्याजवळ येथून पुण्यात येत होते. वैभवराज हा दुचाकी वेगात चालवित होता. त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे गाडी घसरली. त्यानंतर गाडी दुभाजकावर आदळल्याने  तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth dies due to two wheeler hit on Divider in Pune