esakal | कऱ्हा नदीवरील बंधाऱ्यात तरूणाचा बुडून मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

harshad kapde.jpg

चांदगुडेवाडी (ता. बारामती) येथील कऱ्हा नदीवरील बंधाऱ्यात हर्षद सोमनाथ चांदगुडे (वय 20, रा. चांदगुडेवाडी, ता. बारामती) या तरूणाचा बुडून मृत्यू झाला. रविवारी (ता. 20) घडलेली ही दुर्घटना सोमवारी दुपारी निदर्शनास आली. 

कऱ्हा नदीवरील बंधाऱ्यात तरूणाचा बुडून मृत्यू 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सुपे (पुणे) : चांदगुडेवाडी (ता. बारामती) येथील कऱ्हा नदीवरील बंधाऱ्यात हर्षद सोमनाथ चांदगुडे (वय 20, रा. चांदगुडेवाडी, ता. बारामती) या तरूणाचा बुडून मृत्यू झाला. रविवारी (ता. 20) घडलेली ही दुर्घटना सोमवारी दुपारी निदर्शनास आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या संदर्भात हर्षदचे वडील सोमनाथ चांदगुडे यांनी पोलिस चौकीत खबर दिल्याची माहिती हवालदार बापूसाहेब मत्रे यांनी दिली. रविवारी सकाळी हर्षद व वडील सोमनाथ यांनी बंधाऱ्यापलिकडे असलेल्या शेतात जाऊन बाजरीचे सरमाड काढले. त्यानंतर हर्षद घरी जाऊन येतो असे सांगून गेला. त्यानंतर हर्षदची आई दुपारचा डबा घेऊन आली. पुन्हा घरी जाताना बंधाऱ्याच्याकडेला हर्षदचे कपडे व चपला दिसल्या. तो घरी न आल्याने शोधाशोध चालू झाली.

हतबल प्रशासनापुढे ‘जम्बो’ समस्या!

दरम्यान, मंडल अधिकारी राहुल जगताप, वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पावसामुळे बंधाऱ्यातील पाणी पातळी वाढत असल्याने शोधकार्यात अडचणी येत होत्या. मुळशी आपत्ती नियंत्रण समितीचे पथकाला बोलाविण्यात आले होते. सोमवारी दुपारच्या दरम्यान हर्षदचा मृतदेह पाण्याच्याकडेला आढळून आला.