युवकांच्या कार्यावर कौतुकाची मोहोर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

पुणे - अडथळ्यांवर मात करून समाज व देशासाठी रचनात्मक काम करणाऱ्या तरुणांचा डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) युवा व्यासपीठ "यूथ इन्स्पिरेटर्स अवॉर्ड- 2018' देऊन गौरव करणार आहे. सात विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणाऱ्या युवकांचे कौतुक व्हावे आणि अन्य युवकांनाही सकारात्मक कामाची प्रेरणा मिळावी, या हेतूने हे पुरस्कार दिले जाणार आहेत. 

शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करताना समाज व देशासाठी रचनात्मक काम उभे करण्यास प्रेरणा मिळावी, यासाठी "यिन'ने महाविद्यालयीन तरुणांसाठी आयोजित केलेल्या "यिन समर यूथ समिट'च्या निमित्ताने हे गौरव होणार आहेत. मुंबई, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, नागपूर, नाशिक, अकोला, नगर, औरंगाबाद, नांदेड आणि जळगाव या 12 शहरांमध्ये 16 मे ते 16 जून दरम्यान या परिषदा होणार आहेत व या प्रत्येक विभागात ही पारितोषिके देण्यात येणार आहेत. ऍवॉर्डसाठी निलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे मुख्य प्रायोजक, तर पॉवर्ड बाय प्रायोजक हॅशटॅग क्‍लोदिंग आहेत. 

कम्युनिटी सर्व्हिस, सामाजिक सेवा, कला आणि सांस्कृतिक, क्रीडा, शिक्षण, विज्ञान- तंत्रज्ञान- अभियांत्रिकी, एक्‍सलन्स इन यूथ लीडरशिप आणि उद्योग- स्टार्ट अप क्षेत्रांसाठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी नामांकने मागवण्यात येत आहेत. सात क्षेत्रांमधील 18 ते 30 वयोगटातील युवक- युवती या पुरस्कारांसाठी अर्ज करू शकतात. शैक्षणिक कामगिरी, वैयक्तिक यश आणि इतर विशेष कामगिरी या संदर्भातील माहिती, 

बातम्यांची कात्रणे, आधी मिळालेल्या पुरस्कारांची माहिती व छायाचित्रे इत्यादीसह "यिन' समन्वयकांशी किंवा नजीकच्या "सकाळ' कार्यालयाशी संपर्क साधावा. 

"यिन समर यूथ समिट'मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्ती व तज्ज्ञांना भेटायची, तसेच विविध कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रांमध्येही सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. 

Web Title: Youth Forum Youth Inspirators Award - 2018