पैशाच्या वादातून तरुणाचा खून 

संदीप घिसे
रविवार, 6 मे 2018

पिंपरी - पैशाच्या वादातून झालेल्या भांडणात एका तरुणाला दगड मारून जखमी केले. या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही ही घटना रावेत येथे घडली.

पिंपरी - पैशाच्या वादातून झालेल्या भांडणात एका तरुणाला दगड मारून जखमी केले. या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही ही घटना रावेत येथे घडली.

व्यंकटेश चव्हाण असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैशांच्या देवाण घेवाणीवरून मयत व्यंकटेश आणि इतर दोघा जणांमध्ये शनिवारी सकाळी शिंदेवस्ती रावेत येथे भांडण झाले. त्यावेळी  आरोपींनी व्यंकटेशला दगडाने मारहाण केली. या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गंभीर जखमी करण्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. जखमी तरुणाचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: youth murder in money dispute