Pune : सोशल मिडियातील भाषेवरून बारामतीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे युवक आमनेसामने

"सोशल मिडियात अजितदादांबद्दल खालच्या स्तरावरची भाषा जे वापरतात त्यांना समजून सांगा", अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या युवा कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना भेटून केली.
Youth of two NCP factions in Baramati face off over language on social media
Youth of two NCP factions in Baramati face off over language on social mediaSakal

सोमेश्वरनगर : "सोशल मिडियात अजितदादांबद्दल खालच्या स्तरावरची भाषा जे वापरतात त्यांना समजून सांगा", अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या युवा कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना भेटून केली.

तर "तीन-चार तरूणांनी येऊन युगेंद्र पवार यांना केवळ विनंती केली आहे. मात्र नेत्यांना खूष करण्यासाठी मलिदा गँग या प्रकाराला घेराव घातल्याचे स्वरूप देत आहे", असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या युवा कार्यकर्त्यांनी केला आहे.

करंजे (ता. बारामती) येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत कोपरा सभा पार पडली. सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे युवा कार्यकर्ते मिलिंद दरेकर, रोहन गायकवाड, सूर्यकांत पिसाळ, निखिल शेंडकर यानी युगेंद्र पवार यांनी भेट घेतली.

'अजितदादांबद्दल सोशल मिडियात तुमच्या गटाचे काही कार्यकर्ते चुकीची भाषा वापरतात. नालायक... नालायक अशा शब्दांचा वारंवार उल्लेख करून बदनामी करतात. अजितदादांनी तालुक्यासाठी भरपूर केले आहे.

त्यामुळे कार्यकर्त्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी केली. यावर पवार यांनी मी माहिती घेतो असे उत्तर दिले. तर राजेंद्र जगताप यांनी, 'दोन्ही गटानी एकमेकांबद्दल असे बोलू नये. तसे कुणी बोलले असेल तर दुरूस्त करू' असे स्पष्ट केल्यावर विषय संपला. संबंधित गावकऱ्यांनीही संताप व्यक्त केला.

दरम्यान, याबाबत सोशल मिडियात युगेंद्र पवार यांना घेराव घातला, जाब विचारला, काढता पाय घेतला अशा अफवा पसरवल्या गेल्या. याबाबत युगेंद्र पवार यांनी, या किरकोळ गोष्टीबाबत कार्यकर्ते बोलतील अशी प्रतिक्रिया दिली.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवा तालुकाध्यक्ष प्रशांत बोरकर, उपाध्यक्ष सुशिल जगताप म्हणाले, घेराव घालायला पाच-पन्नासजण तरी हवेत. आधी ते चारजण आमच्याकडेच आले आणि युगेंद्रदादांना विनंती करायची आहे असे विचारले. सभा झाल्यावर त्यांनी सोशल मिडियात खालच्या पातळीवर बोलले जाते अशी तक्रार केली.

माहिती घेऊन सांगतो असे युगेंद्रदादा बोलले. यानंतर व्हिडीओ करून संबंधित युवकांनी चुकीचा मेसेज समाजमाध्यमात पसरवला. मलिदा गँगची युगेंद्र पवार यांना घेराव घालण्याईतकी पात्रता नाही. पूर्ण पवार कुटुंबिय आदरणीयच आहे आणि त्यांच्याबद्दल कुणीच चुकीचे बोलू नये.

अजितदादा गटाचे मिलिंद दरेकर म्हणाले, युगेंद्रदादांशी कुठलाही वाद-विवाद, बाचाबाची झालेली नाही. दहा-बाराजण होतो आम्ही. श्रीनिवास बापूंच्या व्हिडीओनंतर काहीजण आवर्जून काही शब्द वापरून सोशल मिडियात अजितदादांची बदनामी करत आहेत याबाबत तक्रार केली. युगेंद्रदादा माहिती घेतो म्हणाले आहेत. आमच्यासाठीपण पूर्ण कुटुंबिय आदरणीय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com