युवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील 

दत्ता म्हसकर
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

जुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे असे आवाहन ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी येथे केले. 

पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात रविवारी ता.१९ रोजी रात्री ८ वाजता आगामी बकरी ईद, गणेशोत्सव व गोकुळाष्टमी सणांच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या सभेत ते बोलत होते.  

यावेळी अप्पर पोलिस अोधीक्षक संदीप जाधव, प्रभारी तहसिलदार रवींद्र सबनीस, उपविभागीय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना, पोलिस निरीक्षक सुरेश बोडखे, मौलाना सादिकुल इस्लाम, नगर सेवक भाऊ कुंभार, फिरोज पठाण, जमीर कागदी, सलीम गोलंदाज, पोलीस पाटील व नागरिक तसेच नारायणगाव, ओतूर, आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले, 'काही विकृत लोक समाजात दुही माजविण्याचे काम  करतात' अशा समाज कंटकावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

“छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नरमध्ये हिंदू व मुस्लीम ऐक्य परंपरा कायम ठेवून जातीय सलोखा बंधु-भाव जपण्याची परंपरा कायम ठेवुन सण उत्सव साजरे असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक पोलिस निरीक्षक सुरेश बोडखे यांनी केले, प्रभारी तहसिलदार रवींद्र सबनीस,भाजपचे शहर अध्यक्ष नंदु तांबोळी, मौलाना सादिकुल इस्लाम, भाऊ कुंभार, यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन विलास कडलक यांनी केले, सहाय्यक पोलिस निरीक्षक मिलिंद साबळे यांनी आभार मानले.

Web Title: Youth should cooperate with law and order: Sandeep Patil