यिन समर यूथ समिटमध्ये तरुणांना मोलाचे मार्गदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

पुणे - ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)’ या युवा व्यासपीठातर्फे आयोजित केलेल्या ‘यिन समर यूथ समिट’ला तिसऱ्या दिवशीही तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परिषेदचा बुधवारी समारोप झाला. 

परिषदेसाठी ‘स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी’ मुख्य प्रायोजक आहे. पॉवर्ड बाय हॅशटॅग क्‍लोदिंग असणाऱ्या परिषदेसाठी पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सुहाना मसाले व अभी ग्रुप ऑफ कंपनीज सहप्रायोजक आहेत. 

पुणे - ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)’ या युवा व्यासपीठातर्फे आयोजित केलेल्या ‘यिन समर यूथ समिट’ला तिसऱ्या दिवशीही तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परिषेदचा बुधवारी समारोप झाला. 

परिषदेसाठी ‘स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी’ मुख्य प्रायोजक आहे. पॉवर्ड बाय हॅशटॅग क्‍लोदिंग असणाऱ्या परिषदेसाठी पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सुहाना मसाले व अभी ग्रुप ऑफ कंपनीज सहप्रायोजक आहेत. 

स्वप्नील जोशी याने सूत्रसंचालन केले. प्रतीक्षा इंगळे, स्नेहाराणी काटे, इशिता राणे, हिमानी पडाळसेकर, किरण कोरे, ओमकार मांडवकर यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. परिषदेसाठी सिनेमा-जाहिरात प्रायोजक खुशी ॲडव्हर्टायझिंग, सोशल मीडिया माइंड मॅटर्स, व्हीआर टेक्‍नॉलॉजी पार्टनर डिजिटल आर्ट व्हीआरई, डिझाइन पार्टनर क्रिएटिव्ह डिझाइन स्टुडिओ, प्रॉडक्‍शन पार्टनगर आयडियाज ओटीएस, प्रिंटिंग पार्टनर कुणाल बॅग्ज, रोबोटिक्‍स ॲण्ड ऑटोमेशन पार्टनर इंडिया फर्स्ट रोबोटिक्‍स आहेत. 

समाज घडविण्याची ताकद स्वत: निर्माण करा : मेहता 
‘‘शिक्षणाने बदल घडतो. मात्र, काही तरुणांना त्यासाठी खूप अडचणी सहन कराव्या लागतात. शारीरिक  मर्यादेला भेदत काहीतरी करू पाहणाऱ्या सहा दिव्यांग तरुण-तरुणींनाही सर्वतोपरी मदत करणार आहोत. याचबरोबर महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटकातील १२ विद्यार्थिनींना इन्स्टिट्यूटमध्ये  शिक्षण ते नोकरीपर्यंतची सुविधा करणार,’’ अशी घोषणा निलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे निलय मेहता यांनी ‘यिन समर यूथ समिट’मध्ये केली. ते म्हणाले, ‘‘आपल्यातील प्रत्येक जण घडला पाहिजे आणि त्याने समाज घडविण्याची ताकदही स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. खासकरून तरुण-तरुणींनी गावोगावी जाऊन शिक्षण संस्था उभ्या केल्या पाहिजेत. फक्त शिक्षणच माणसाला माणूस बनवू  शकते आणि यशस्वी बनवू शकते.’’

प्रत्येक व्यवसायात अडचणी येतात; पण त्यांना सामोरे जात नव्या संधींचा शोध घ्या आणि बदल घडवायला शिका. व्यवसाय पुढे कसा नेता येईल, याचा गोल सेट करा आणि मेहनत करा. नक्कीच यशस्वी व्हाल.
- वस्तुपाल रांका, संचालक, रांका ज्वेलर्स

जीवनात चौकस व चतुर कसे होता येईल हे आपण शिकले पाहिजे. जीवनातील प्रत्येक अनुभवांमधून काहीतरी शिका. त्यातील  अनुभवातून आपण घडत  जातो. 
- सुनंदन लेले, क्रीडा समीक्षक

मनुष्यबळ विकास विभागात (एचआर) नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे या विभागाच्या माध्यमातून लक्ष दिले जाते. म्हणूनच तरुणांनी या क्षेत्रातही करिअरची वाट शोधली पाहिजे. 
- समीर कुकडे, एचआर प्रोफेशनल

तंत्रज्ञानात डिझाइन वापरताना त्याचा उपयोग प्रत्येकाला कसा करता येईल, याचा विचार करायला हवा. भविष्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानात डिझाइनचे महत्त्व कसे असेल, याचा विचार झाला पाहिजे. 
- अमृत राजपुजारी, डिझाइन तज्ज्ञ  

भारतातील युवक हे धडपडणारे असून, त्यांच्यातील नेतृत्वगुणाला संधी आणि त्यांना दिशा देण्याचे काम ‘यिन’ करत आहे. ‘यिन’ने आयोजित केलेल्या अशा उपक्रमांची सध्या तरुणाईला गरज आहे.
- ॲड. वंदना चव्हाण, खासदार

शिक्षणाबरोबरच धाडस असणे महत्त्वाचे आहे. त्यातूनच आपल्यातील तरुण घडू शकतो. समाजात अशी पिढी घडली पाहिजे जी आपले म्हणणे रुजविण्यासाठी प्रयत्नशील राहील. 
- लक्ष्मण जगताप, आमदार

Web Title: Youth Summit Youth Summit offers valuable guidance to young people