
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पुणे शहरातील हडपसर परिसरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. राहुल शिवाजी मिसाळ या २८ वर्षीय युवकाने स्वतःची मैत्रीण अनिता रमेश लोंढे (वय २७ वर्षे) हिचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर राहुलने स्वतः यवत पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.