wagholi
wagholi

वाघोलीत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी युवकांचा पुढाकार

वाघोली : वाघोलीतील वाहतूक कोंडीतून सध्या चांगला दिलासा मिळाला आहे. मात्र कोंडी होऊच नये यासाठी युवक पुढे येऊ लागले आहेत. त्यासाठी व्हाट्सउप ग्रुप तयार करण्यात आला आहे. काही शालेय संस्थेचे मुलेही ही या कामी मदत करीत आहेत. चौकात उभे राहून पोलिस व वॉर्डन बरोबर ते वाहतुकीचे नियंत्रण करीत आहे. दुसरीकडे लोणीकंद पोलिसांनीही बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्यासाठी कारवाई सुरूच ठेवली आहे. तर ग्रामपंचायत शक्य त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान आज श्रावणी सोमवार असूनही वाहतूक सुरळीतपणे सुरू होती.

वाघोलीतील वाहतूक कोंडीमुळे काही शाळांना सुट्टी देण्याची वेळ मागील सोमवारी आली होती. हे वृत्त सकाळ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर या विषयाचे गांभिर्य अधिकच वाढले. सर्व यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. महामार्गालगतच्या साईड रस्त्यावर ग्रामपंचायतीने खडी टाकल्याने अधिक दीड लेन वाढली. या मुळे कोंडीतून चांगलाच दिलासा मिळाला. ही कोंडीच होऊ नये यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी नगर रोड वाहतूक कृती समिती हा व्हाट्सउप ग्रुप ही तयार करण्यात आला आहे.

मेसेज मिळाला की.....
नगर रोड वाहतूक कृती समिती हा व्हाट्सउप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुप वर वाहतूकीबाबत माहिती टाकली जाते. कोंडी नुसार या ग्रुप मधील युवक त्या चौकात जाऊन वाहतूक नियंत्रणाचे काम करतात.

 रस्त्यासाठी आर्थिक मदत
शंकर पार्वती मंगल कार्यालय ते आर एम सी सोसायटी पर्यंत रस्त्याच्या दुरुस्ती साठी संपत गाडे यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे. सध्या रस्त्याचे काम सुरू असून यामुळे वाघेश्वर मंदिर चौकातून बाईफ रोड कडे होणारी उलटी वाहतूक थांबणार आहे. 

सिग्नल्स सुरू होणार
वाघेश्वर मंदिर चौकातील तुटलेला सिग्नल्स पुन्हा बसविण्यात आला आहे. वाघोलीतील तिन्ही सिग्नल्स दोन दिवसात सुरू केले जाणार असल्याची माहिती उपसरपंच संदीप सातव यांनी दिली. खड्डे झालेल्या साईड तसेच काही अंतर्गत रस्त्यावर खडी टाकण्याचे काम सुरू असल्याचे ही त्यांनी सांगितले.

कडक कारवाई करा
वाघोली हौसिंग सोसायटी अससोसिएशनच्या सदस्यांनी पोलीस  निरीक्षक प्रताप मानकर यांची भेट घेऊन वाहतूकी बाबत चर्चा केली. तसेच उलट्या दिशेने वाहतूक करणाऱ्या स्कूल बस वर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.

 दंड वसूल
 लोणीकंद पोलिसानी सहा दिवसात 230 वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत 57 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व सहायक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी दिली. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या व इतर दुकाने ही तोरडमल यांनी हटविले. नागरिकांनी सहकार्य करावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा पोलिसानी दिला आहे.

उलट्या दिशेने न जाण्याचे आवाहन
बाईफ रोड कडे जाण्यासाठी शंकर पार्वती मंगल कार्यालय ते आर एम  सोसायटी पर्यंत रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी उलटे न जाता त्या रस्त्यावरून बाईफ रोड कडे जावे असे आव्हान ग्रामपंचायत व लोणी कंद पोलिसानी केले आहे. सोमवारी मात्र ही उलटी वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले.

नागरिक कारवाई करणार
एकीकडे वाहतूक कोंडीमुळे स्कूल बंद ठेवण्याची वेळ येत असली तरी दुसरीकडे याच स्कूलच्या बसेस अनेक वेळा उलट्या दिशेने वाहतूक करतात. त्यामुळे मुलांचा जीव तर धोक्यात येतोच या शिवाय कोंडी ही वाढते. अशा बस उलट्या दिशेने जाताना दिसल्यास त्या पकडून पोलिसांच्या हवाली करू असा इशारा काही नागरिकांनी दिला आहे. स्कूलने चालकांना सूचना द्याव्यात असे आवाहन नागरिकांनी केले आहे.

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com