युवकाने केला सिंदोळा सुळका सर (व्हीडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

जुन्नर - मढ-पारगाव (ता. जुन्नर) येथील किल्ले सिंदोळा चिमणी (सुळका) सोनावळे (ता. जुन्नर) येथील विशाल सोनू बोऱ्हाडे (वय २१) या तरुणाने सर केला असल्याची माहिती मार्गदर्शक माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी दिली.

यासाठी त्यास २५ मिनिटांचा कालावधी लागला. सह्याद्रीचे सौंदर्य फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित झाल्यामुळे येणाऱ्या कालावधीत जर काही आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर या नवतरुणांच्या माध्यमातून तत्पर मदत केली जाईल, यासाठी खरमाळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. या वेळी विनायक साळुंके, प्रतीक बोऱ्हाडे व समीर कोंदे यांनीही चिमणी क्‍लायबिंगचा अनुभव घेतला.

Web Title: Youth Vishal Borhade Sindola Sulaka Success