राज ठाकरेंवर केली टीका; काढायला लावल्या उठाबशा

mns
mns

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अधिकृत पेजवर टीका करणाऱया युवकाला मनसैनिकांनी उठाबशा काढायला लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राज ठाकरे यांच्या अधिकृत पेजवर एका युवकाने आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. मनसैनिकांनी त्या तरुणाचा शोध घेतला असता तो पुण्यात राहत असल्याचे उघड झाले. पुण्यातील विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष साबळे-पाटील यांच्यासह मनविसेचे शहर अध्यक्ष विकी अमराळे, विभाग अध्यक्ष राहुल गवळी आदी त्या युवकाच्या घरी गेले होते. मनसैनिकांनी त्या तरुणाला जाहीर माफी मागायला लावली तसेच त्याला 50 उठाबशा काढायला लावल्या. यापुढे राज ठाकरेंवर आक्षेपार्ह आणि असभ्य शब्दात टीका करणाऱ्यांना अशीच शिक्षा दिली जाईल, असा इशाराही मनसैनिकांनी दिला.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संबंधित पोस्टमध्ये म्हटले आहे की, युवकाची पोस्ट वाचून मनसैनिक चिडले होते, पण त्या युवकाच्या घरी गेल्यावर त्याची परिस्थिती हलाखीची असल्याचे समजले. शिवाय, त्याचे घर भाड्याचे असून, वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे त्याला मारहाण न करता उठाबशा काढायला लावल्या, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. व्हिडिओवर नेटीझन्सनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com