मानले पाहिजे राव! तरुणांनी श्रमदानाने रस्ता केला मोकळा 

सुदाम बिडकर
Sunday, 13 September 2020

पहाडदरा ता. आंबेगाव घाटातील वहातुकीला  अडथळा ठरणाऱ्या व अपघाताला निमित्त ठरणार्या झाडाच्या फांद्या धामणी येथील तरुणांनी स्वयंस्फुर्तीने श्रमदान करुन काढल्या.

पारगाव : पहाडदरा ता. आंबेगाव घाटातील वहातुकीला  अडथळा ठरणाऱ्या व अपघाताला निमित्त ठरणार्या झाडाच्या फांद्या धामणी येथील तरुणांनी स्वयंस्फुर्तीने श्रमदान करुन काढल्या.

अवसरी बुद्रुक पहाडदरा हा घाट रस्ता निसर्ग रम्य ठिकाण आहे लोणी धामणी परिसरातील नागरिक या घाट रस्त्याचा उपयोग अवसरी मंचर येथे जाण्यासाठी करतात तालुक्यातील अनेक गावातील नागरिक सुद्धा या रस्त्याला निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी येत असतात.

परंतु रस्त्याच्या कडेची झाडे झुडुपे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने याठिकाणी वाहन चालकाला समोरुन आलेले वाहन दिसत नव्हते, या आशयाची बातमी अनेकदा दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झाली होती. धामणी गावांमध्ये जनता कर्फ्यू होता त्यामुळे धामणी गावचे सरपंच सागर जाधव यांनी आपल्या सहकार्‍यांसह पहाडदरा घाटात येऊन अनावश्यक असलेल्या झाडाच्या फक्त फांद्या काढून रस्ता मोकळा केला.

या परिसरात काही नवीन झाडांच्या रोपांचे वृक्षारोपनही केले. ही झाडे काढताना झाडे तोडली नसून फक्त फांद्या तोडल्या आहेत, यासाठी सागर जाधव, दत्तात्रय गवंडी, अक्षय विधाटे, धनंजय जाधव, संतोष वायकर, नयन बोंबे, प्रतीक विधाटे, सतीश देशमुख यांनी हे काम केले आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The youth worked hard to clear the road