पुणेकरांनो, तुम्ही वाचलेली पुस्तके, ग्रंथ दान करा; युवकांनी केलंय आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

नंदुरबार येथील युवकमित्र परिवारातील युवकांतर्फे राज्यभर ही चळवळ राबविण्यात येत आहे.

पुणे : राज्यात वाचन चळवळ राबविण्यात येत आहे. या चळवळींतर्गत 'गाव तेथे ग्रंथालय' उभारण्यात येत आहे. यासाठी आपणही खारीचा वाटा उचलू शकता. त्यासाठी केवळ वाचलेली पुस्तके आणि ग्रंथ दान करा, असे आवाहन या चळवळीतील युवकांनी पुणेकरांना केले आहे. 

नंदुरबार येथील युवकमित्र परिवारातील युवकांतर्फे राज्यभर ही चळवळ राबविण्यात येत आहे. त्यानुसार पुणे शहरात येत्या १५ ऑक्टोबरपर्यन्त ही मोहीम राबविली जाणार आहे. नागरिकांनी वाचून झालेले जुने, नवे ग्रंथ दान करावेत, असे आवाहन या चळवळीचे संस्थापक प्रवीण महाजन यांनी केले आहे.

पुणेकरांची काळजी वाढवणारी बातमी; पुढील १२ दिवसांत वाढणार ७९ हजार कोरोना रुग्ण!​

महाजन म्हणाले, "युवकमित्र परिवारातर्फे राज्यातील ग्रामीण भागात वाचनालये स्थापन केली जातात.या वाचनालयांना मोफत ग्रंथ भेट दिले जातात. यासाठी पुणे शहरात 'सेवा सप्ताह, दान सप्ताह, वाचन प्रेरणा दिनाच्या धर्तीवर 'ग्रंथ संकलन मोहीम' राबविण्यात येत आहे. नागरिकांनी दान केलेले जुने आणि नवे ग्रंथ ग्रामीण, दुर्गम भागातील वाचनालयांना प्रदान केले जाणार आहेत."

मावळते पोलिस आयुक्त डॉ. वेंकटेशम यांनी पोलिसांबद्दल भावना केल्या व्यक्त, म्हणाले...​

यासाठी ग्रंथ देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी फोन केल्यानंतर, युवक परिवारातील स्वयंसेवक आपण सांगितलेल्या पत्त्यावर येऊन ग्रंथ घेऊन जाणार आहेत. त्यामुळे पुणे शहरातील ग्रंथदान करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी ९५२९१२५३९६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन चळवळीतील सागर पाटील, चेतन मराठे, राम जवान, गणेश माळी, मनोज वारुडे आदी युवकांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youths appealed to Pune citizens to donate books and texts