"झाला बोभाटा' होणार उद्या प्रदर्शित 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

पुणे - बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर मराठीत ग्रामीण कथा असलेला "झाला बोभाटा' हा विनोदी सिनेमा येत आहे. अनुप जगदाळे दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती किंग क्रिएशन डीजी टेक्‍नो एन्टरप्रायजेस प्रॉडक्‍शनच्या साईनाथ राजाध्यक्ष आणि महेंद्रनाथ यांनी केली आहे. हा चित्रपट 6 जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

साईनाथ राजाध्यक्ष म्हणाले, ""आम्ही सामाजिक आशय- विषय असलेला विनोदी सिनेमा केला आहे. आमच्या सिनेमासाठी इतकी चांगली आणि मोठी स्टारकास्ट मिळाली, याबद्दल आम्ही स्व:ताला नशीबवान समजतो.'' 

महेंद्रनाथ म्हणाले, ""अनुपने मला हे कथानक ऐकवले तेव्हाच या सिनेमावर काम करण्याचा निर्णय घेतला. मलासुद्धा भूमिका करण्याची संधी मिळाली असून, प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत काम करण्याचा हा अनुभव अतिशय वेगळा होता.'' 

अनुप जगदाळे म्हणाले, ""दिग्दर्शक म्हणून हा माझा पहिलाच सिनेमा आहे. तरीही दिग्गज कलाकारांकडून मला चांगली साथ मिळाली. प्रेक्षक आमच्या मेहनतीच भरभरून कौतुक करतील, असा विश्‍वास आहे.'' 

या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, कमलेश सावंत, संजय खापरे, दीपाली अंबिकार, तेजा देवकर, मयूरेश पेम, मोनालिसा बागल, महेंद्रनाथ, बाळकृष्ण शिंदे, रोहित चव्हाण, रिना अग्रवाल, अश्विनी सरपुर, डॉ. साहिल, नीलेश भोईर, रोहित साळवी आदी कलाकार आहेत. कथा अनुप अशोकराव जगदाळे यांनी लिहिली असून, पटकथा आणि संवाद अरविंद जगताप यांनी लिहिले आहेत. 

सिनेमातील गाणी प्रसिद्ध संगीतकार ए. व्ही. प्रफुलचंद्र यांनी संगीतबद्ध केली आहेत. तर नुकताच मराठी फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले गीतकार मंगेश कांगणे यांनी ही गाणी लिहिली आहेत. कांगणे यांचा गीतकार म्हणून हा 75वा मराठी सिनेमा आहे. आदर्श शिंदे, प्रवीण कुंवर, ए. व्ही. प्रफुलचंद्र आणि सरोज बोधनकर यांनी ही गाणी गायली आहेत. 

Web Title: zala bobhata movie tomorrow release