आंबेगाव तालुक्‍यातील झेंडू, टोमॅटो रस्त्यावर

आंबेगाव तालुक्‍यातील झेंडू, टोमॅटो रस्त्यावर

महाळुंगे पडवळ - आंबेगाव तालुक्‍यात बाजारभावाअभावी झेंडूची फुले मातीमोल झाली असून, ऐन नवरात्रोत्सवाच्या तोंडावर फुले फेकून देण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर ओढावला आहे. 

तर, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बाजारभावात सुधारणा होत नसल्याने टोमॅटो उत्पादकांनी तोडणी थांबविली आहे. पिकासाठी गुंतवलेल्या लाखो रुपयांच्या कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दबला आहे. स्वप्नांचा लाल चिखल

होत असल्याने शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे. आंबेगाव तालुक्‍यात चास, ठाकरवाडी, महाळुंगे पडवळ, लौकी, कळंब, साकोरे, चांडोली बुद्रुक, नांदूर, टाकेवाडी, थोरांदळे, रांजणी, निरगुडसर, अवसरी खुर्द, पारगाव, शिंगवे
आदी गावांत शाश्‍वत पाणी उपलब्ध असलेले शेतकरी टोमॅटो व झेंडूचे पीक घेतात. तालुक्‍यात पाच हजार एकर क्षेत्रांत दोन्ही पिकांची लागवड असल्याचा अंदाज आहे. वीस किलो वजनाचे टोमॅटोचे क्रेट दहा रुपयांना विकले जात असून, प्रतिकिलो ५० पैसे बाजारभाव मिळतो. कवडीमोल बाजारभावाने विक्री झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोने बहरलेली फळे तोडणी करण्याचे सोडून दिले आहे. तसेच, रस्त्याच्या कडेला लाल चिखलाचे ढीग पाहावयास मिळत आहेत. ‘आई भीक मागून देईना, सरकार जगू देईना...’ अशी अवस्था झाली आहे, असे कळंब येथील शेतकरी दिनेश खैरे यांनी दिली आहे.

गणपती, नवरात्र उत्सव व दसरा आदी सणांमध्ये फुलांना अधिक मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी ॲरा गोल्ड, गोल स्पॉट टू, भगवती, कलकत्ता आदी झेंडू फुलांच्या विविध जातींची लागवड केली. रोपे, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, मजुरी, औषधे, असा एकरी ३५ ते ४० हजार रुपये खर्चही केला. विविध रोगराईंवर मात करून भरघोस उत्पादनदेखील घेतले. परंतु उत्पादन सुरू झाल्याने बाजारभाव पाच ते दहा रुपये किलो मिळत आहे. त्यामुळे नफा तर सोडाच, उत्पादन खर्चही भागत नाही. बाजारभाव कवडीमोल मिळत असल्याने अक्षरशः फेकून देण्याची वेळ आली आहे, असे चास येथील शेतकरी बाळासाहेब चासकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com