

Zero Shadow Day in Pune Today: Know the Amazing Science Behind the Rare Phenomenon
sakal
What is Zero Shadow Day 2026: दुपारी उन्हात उभं राहिल्यावर आपली सावली दिसत नाही, असं कधी होऊ शकतं का? ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी 13 मे रोजी पुणेकरांना हा भन्नाट अनुभव प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे. काही मिनिटांसाठी माणूस, बाटली, खांब किंवा कोणतीही उभी वस्तू जमिनीवर सावलीच टाकणार नाही. “झिरो शॅडो डे” म्हणून ओळखला जाणारा हा दुर्मिळ खगोलशास्त्रीय प्रकार विज्ञानप्रेमींसाठीच नाही तर सामान्य नागरिकांसाठीही मोठं आकर्षण ठरणार आहे.