शून्य सर्पदंश विशेष कार्यक्रम; आरोग्यमंत्री व गृहमंत्र्यांची उपस्थिती

डॉ.राऊत ह्यांच्या पुढाकाराने गुरुवारी मुंबईत शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पावर विशेष कार्यक्रम
शून्य सर्पदंश विशेष कार्यक्रम; आरोग्यमंत्री व गृहमंत्र्यांची उपस्थिती

जुन्नर :(दत्ता म्हसकर) गेल्या तीन दशकापासून सर्पदंश ह्या विषयावर स्वतःला समर्पित करणाऱ्या डॉ. सदानंद राऊत व डॉ. पल्लवी या दाम्पत्याच्या पुढाकाराने आज गुरुवार ता.११ रोजी मुंबई येथील सह्याद्री ह्या शासकीय अतिथीगृहात चार वाजता शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ह्या कार्यक्रमाला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. राऊत ह्यांनी सर्पदंश ह्या विषयावर लोकांपर्यंत योग्य माहिती मिळावी, प्रबोधन व्हावे ह्या उद्देशाने एक विशेष माहितीपट बनविला असून ह्या माहितीपटाचे विमोचन यावेळी करण्यात येणार आहे.

डॉ. राऊत ह्यांच्या विघ्नहर मेडिकल फाउंडेशन व वंदे किसान तर्फे सर्पदंश विषयावर तीन विविध अभ्यासक्रम बनविण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम संपूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी आमदार अतुल बेनके,आरोग्यविभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, प्रधान सचिव डॉ एम एन केरकेट्टा आय. एम. ए. चे अध्यक्ष डॉ रामकृष्ण लोंढे आय. सि. एम. आर. चे संचालक सौ गीतांजली सचदेवा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदरील कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी असल्याचे डॉ.राऊत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com