'झिका'चा संसर्ग : घाणीच्या साम्राज्यामुळं नागरिकांच्या जीवाला धोका

‘झिका’च्या पार्श्वभूमीवर खळद ग्रामपंचायतीकडून ‘अजय बायोटेक’ची पाहणी; विदारक चित्र आले समोर
zika virus
zika virussakal

खळद (ता.पुरंदर) : अजय बायोटेक इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये सुमारे अडीचशे ते तीनशे पुरुष, महिला कामगार काम करीत असून कंपनीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे कामगारांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. (Zika infection pune khalad grampanchayat alert)

संपूर्ण राज्याला हादरा देणारा झिका व्हायरसचा पुरंदरमध्ये शिरकाव झाला असून, याचा पहिला रुग्ण खळदगावच्या जवळील बेलसर गावात आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे ग्रामपंचायतीने संभाव्य धोका ओळखून आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर गावाला बाहेरून धोका होऊ नये यासाठी ग्रामपंचायती पदाधिकाऱ्यांनी व या कंपनीला अचानक भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली असता अतिशय विदारक परिस्थिती आढळून आल्याने धक्का बसला.

zika virus
पुणे : कोरोनामुळे यंदा २५ टक्केच कर्मचाऱ्यांच्या बदल्या

कंपनीमध्ये होणाऱ्या कचऱ्याचे विघटन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याचे यावेळी पहावयास मिळाले. पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त पेशंट सदर कंपनीत आढळून आले होते तरीदेखील कंपनी प्रशासनाला जाग आली नाही.

यावेळी नीरा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब कामथे, सरपंच कैलास कामथे, ग्रामपंचायत सदस्य योगेश कामथे, माजी उपसरपंच सुरेश रासकर, संजय कामथे, योगेश वि. कामथे, अभिजित कादबाणे उपस्थित होते. मात्र, कंपनीमध्ये या सर्व पार्श्वभूमीवरती उत्तर देण्यासाठी कोणताही जबाबदार अधिकारी आज उपलब्ध नव्हता.

अजय बायोटेक कंपनीमध्ये आमच्या गावचेच नागरिक, महिला काम करीत असून आजची ही परिस्थिती पाहता या दुर्गंधीयुक्त वातावरणात काम करून त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याची प्रदूषण महामंडळाकडे तातडीने तक्रार करणार असून सदर कंपनीची तपासणी होणे गरजेचे आहे, असे सरपंच कैलास कामथे यांनी सांगितले.

zika virus
पुणे : महापालिकेत समाविष्ट किवळेगावास आला शहराचा लुक

घाणीचा डिगाऱ्यांतून पसरतोय दुर्गंधीयुक्त काळे पाणी

कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावरही चिखलाचा राडारोडा पसरला आहे तर बाजूला असणाऱ्या पाण्याच्या टाकीमध्ये संपूर्ण उघडे व हिरवे पाणी झाल्याचे पाहावयास मिळाले. सदर कंपनी खताचे उत्पादन करीत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर छोटे, मोठे बॅरल, कागदी पुठ्ठे, औषधांच्या रिकाम्या बाटल्या व इतर साहित्य हे कंपनीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर उघड्यावर पडले आहे. या घाणीचा डिगाऱ्यांमधून दुर्गंधीयुक्त काळेपाणी कंपनीमध्ये पसरले आहे. त्यावरती मोठ्या प्रमाणावर मच्छरांची पैदास होत आहे.

कंपनी उद्यापासून बंद ठेवण्याची सूचना

अजय बायोटेक कंपनीतील कचरा, दुर्गंधी जोपर्यंत दूर नाही तोपर्यंत कंपनी प्रशासनाने उद्यापासून कंपनी बंद ठेवावी, अशा सूचना संबंधित कंपनी प्रशासनाला फोनद्वारे ग्रामपंचायतीने दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com