esakal | ZP विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार का? राज्य सरकारच्या आदेशाकडे लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

ZP विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार का? राज्य सरकारच्या आदेशाकडे लक्ष

गेल्या वर्षीही कोरोनामुळे परीक्षा घेता आल्या नव्हत्या.

ZP विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार का? राज्य सरकारच्या आदेशाकडे लक्ष

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : कोरोनामुळे जिल्हा परिषद शाळांमधील सर्व वर्गांच्या वार्षिक परीक्षा यंदाही लटकल्या आहेत. या परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा परिषदांबाबत राज्य सरकारकडून अद्याप काहीही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे या परीक्षांबाबत पुणे जिल्हा परिषदेने राज्य सरकारकडून मार्गदर्शन मागविले आहे.

गेल्या वर्षीही कोरोनामुळे परीक्षा घेता आल्या नव्हत्या. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शाळांमधील सरसकट सर्व विद्यार्थ्यांना परीक्षाविनाच पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला होता. कोरोनामुळे मागील वर्षभरापासून ऑफलाइन शाळा बंदच आहेत. केवळ ऑनलाइनच्या माध्यमातून या शाळा भरत आहेत.

पूर्व नियोजनानुसार दरवर्षी साधारणतः १५ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत जिल्हा परिषद शाळांमधील सर्व वर्गांच्या वार्षिक परीक्षा होतात. त्यानंतर महाराष्ट्र दिनी (१ मे) परीक्षांचा निकाल जाहीर केला जातो. वार्षिक परीक्षांच्या पूर्व नियोजनाला गेल्या वर्षी पहिल्यांदाच खंड पडला होता. यंदा सलग दुसऱ्यांदा याची पुनरावृत्ती होते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : सोनं ४० हजारांच्या खाली येणार? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० ला पुणे शहरात सापडला. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारने १६ मार्च २०२० पासून शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. परिणामी गेल्या वर्षी पहिल्यांदा जिल्हा परिषद शाळांच्या परीक्षा घेता आल्या नाहीत. त्यानंतरसुद्धा या परीक्षा घेता येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील सरसकट सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला होता, असे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील कुऱ्हाडे यांनी सांगितले.

चेंडू सरकारच्या कोर्टात
शहर व जिल्ह्यातील सीबीएसई बोर्डाच्या शाळांनी सर्व वर्गांच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यास सुरुवात केली आहे. परीक्षांबाबतचा निर्णय या खासगी शाळांनी त्यांच्या पातळीवरच घेतला आहे. मात्र सरकारी शाळांना सरकारी आदेशाशिवाय परस्पर अशा परीक्षा घेता येत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या वार्षिक परीक्षांच्या निर्णयाचा चेंडू सध्या तरी राज्य सरकारच्या कोर्टात पडून आहे.

हेही वाचा : LPG Gas Cylinder price : सर्वसामान्यांना दिलासादायक बातमी

गेल्यावर्षापासून शाळांना ‘लॉकडाउन’
-कोरोनामुळे १६ मार्च २०२० पासून शाळा बंद
-मागील वर्षी परीक्षांविना दिला होता पुढील वर्गात प्रवेश
-राज्यातील ऑफलाइन शाळा अद्यापही बंदच
-कोरोना पुन्हा वाढल्याने यंदाही वार्षिक परीक्षा लटकल्या
-जिल्हा परिषदेने राज्य सरकारचे मार्गदर्शन मागविले

loading image