इंदापूर तालुक्यातील 575 महिलांना 'झेडपी'च्या वतीने सहकार्य

इंदापूर तालुक्यातील 575 महिलांना 'झेडपी'च्या वतीने सहकार्य

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील ५७५ महिला व मुलींना स्वयंरोजगार निर्मिती व व्यवसासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यामातुन २०१८-१९ वर्षाकरीता वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी मदत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.

ग्रामीण भागातील  महिलांना स्वत:च्या पायावरती उभे राहण्यासाठी तसेच स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजनेतंर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने व्यवसायासाठी मदत करण्यात येते. यातंर्गत इंदापूर तालुक्यातील ३८८ महिलांना शेळी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी झेडपीच्या वतीने मदत करण्यात आली आहे. १३५ महिलांना शेवई मशिन खरेदी करण्यासाठी मदत करण्यात आली असुन यामुळे महिलांना घरगुती व्यवसाय सुरु करण्यात मोलाची मदत होणार आहे.

घरबसल्या महिला शेवया तयार करु शकणार आहेत. तर २७ महिलांना ब्युटीपार्लरचे साहित्य खरेदी करण्यासाठी झेडपीच्या वतीने सहकार्य करण्यात आले आहे. २१ महिलांना विशेष आर्थिक मदत म्हणून सहकार्य करण्यात येणार आहे. तसेच विशेष प्राविण्य मिळवलेल्या ४ मुलींना ही आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com