झेडपी स्थायीची जागा अंतर्गत वादात रिक्तच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

पुणे जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गतवादाचा फटका पुन्हा जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्याच्या रिक्त जागेला बसला. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता यांच्यासह काँग्रेसच्या दोन्ही इच्छुकांनी सोमवारी सर्वसाधारणसभेत तीन तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर माघार घेतली. त्यामुळे दोघांच्या वादात पुन्हा एकदा ही जागा रिक्त राहिली आहे.

पुणे - पुणे जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गतवादाचा फटका पुन्हा जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्याच्या रिक्त जागेला बसला. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता यांच्यासह काँग्रेसच्या दोन्ही इच्छुकांनी सोमवारी सर्वसाधारणसभेत तीन तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर माघार घेतली. त्यामुळे दोघांच्या वादात पुन्हा एकदा ही जागा रिक्त राहिली आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या आई रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. स्व. पाटील यांच्या जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत अंकिता पाटील विक्रमी मताधिक्‍य मिळवत निवडून आल्या होत्या. 

दरम्यान, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार २२ ऑगस्टच्या सर्वसाधारणसभेत स्थायी समिती सदस्याची निवडणूक होणार होती. परंतु या जागेवर कोण? अंकिता पाटील की दत्तात्रेय झुरंगे या काँग्रेसमधील दोन इच्छुकांमुळे ही सभा अनिश्‍चित काळासाठी तहकूब करण्यात आली होती. 

सोमवारी पुन्हा ही सभा बोलविली होती. यात पाटील आणि झुरंगे या दोघांनीही माघार घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ZP Standing Committee Post Empty in Internal Dispute