पुणे झेडपीकडून डीबीटीचे अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

डिबीटी अंतर्गत कृषी व पशुसंवर्धन या दोन्ही विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक योजनांसाठी अर्ज सादर करण्यास 23 ऑक्टोबर पर्यंत जिल्हा परिषदेने मुदतवाढ दिली आहे.

शेटफळगढे  : जिल्हा परिषदेच्या वतीने सन 2020 -21 या आर्थिक वर्षामध्ये राबविण्यात येत असलेल्या थेट लाभ हस्तांतरण योजना अर्थात डिबीटी अंतर्गत कृषी व पशुसंवर्धन या दोन्ही विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक योजनांसाठी अर्ज सादर करण्यास 23 ऑक्टोबर पर्यंत जिल्हा परिषदेने मुदतवाढ दिली आहे.

Pune Rain : अनेकांसाठी ठरली रात्र वैऱ्याची; पाणी घरांत घुसल्याने नागरिकांना भरली धडकी

यापूर्वी या दोन्ही विभागांसाठी अर्ज करण्यास 15 ऑक्टोबर ही अंतिम तारीख होती. मात्र या दोन्ही योजनांसाठी अर्ज सादर करताना शेतकऱ्यांना त्यासोबत सातबारा व आठ अ जोडणे अत्यावश्यक होते. मात्र वादळ पावसामुळे सर्वर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन सात बारा व 8अ चे उतारे वेळेत मिळू शकले नाहीत. त्यामुळे या योजने पासून कोणी शेतकरी लाभार्थी वंचित राहू नये. यासाठी जिल्हा परिषदेने ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने येत्या 23 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदत वाढ दिली आहे.

Pune Rain : अनेकांसाठी ठरली रात्र वैऱ्याची; पाणी घरांत घुसल्याने नागरिकांना भरली धडकी

दरम्यान, यां शेतकऱ्यांना कृषी विभागाकडील तीन पाच साडेसात अश्‍वशक्तीच्या विद्युत मोटारी, अडीच इंची व तीन इंची पीव्हीसी पाईप ,  कडबा कुट्टी  औषध फवारणी पंप  या व विविध स्वरूपांच्या वस्तूंसाठी अर्ज सादर करता येणार आहेत. तसेच पशुसंवर्धन विभागाकडे मिल्किंग मशीन  रबर मॅट, मुक्त संचार गोठा या व इतर वस्तूंसाठी शेतकऱ्यांना अर्ज सादर करता येणार आहेत.

सिगारेट ओढण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

यासाठी शेतकऱ्यांना सात बारा   आठ अ रेशन कार्ड झेरॉक्स  आधार कार्ड झेरॉक्स, घरगुती विद्युत जोडणी लाईट बिल या स्वरूपाची कागदपत्रे अर्जासोबत सादर करणे गरजेचे आहे. मात्र पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पशुधन असणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या वाढीव दिलेल्या मदतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ZP's deadline for submission of DBT applications extended till October 23