
31 मार्च रोजी पंजाबमधील राज्यसभेच्या 5 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
Punjab : राघव चढ्ढासह हरभजन सिंग राज्यसभेवर जाणार!
पंजाबमधील (Punjab) सातपैकी पाच जागांसाठी 31 मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) शिक्षणतज्ज्ञ संदीप पाठक, दिल्लीचे आमदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांची उमेदवारी AAP नं जाहीर केलीय.
पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjab Assembly Election) घवघवीत यश मिळवल्यानंतर आम आदमी पार्टी आता राज्यसभा निवडणुकीची तयारी करत आहे. वास्तविक, 31 मार्च रोजी पंजाबमधील राज्यसभेच्या 5 जागांसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, राघव चढ्ढा यांची राज्यसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यांचं वय 33 वर्षे आहे. जर चड्ढा राज्यसभेत पोहोचले तर ते देशातील सर्वात तरुण राज्यसभा खासदार असतील. याआधी 35 वर्षीय मेरी कोम सर्वात तरुण खासदार ठरली होती. पंजाबमध्ये 117 पैकी 92 जागा 'आप'नं जिंकल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीत 'आप' 5 जागा जिंकू शकेल, असं मानलं जातंय.
हेही वाचा: ठरलं! एन. बीरेन सिंह आज पुन्हा घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
राघव चड्ढा 2020 मध्ये दिल्लीच्या राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वी त्यांनी पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहिलंय. दरम्यान, पंजाब विधानसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी राघव चढ्ढा यांना सहप्रभारी म्हणून पाठवण्यात आलं होतं.
हेही वाचा: भाजपला मतदान करणं पडलं महागात; मुस्लिम महिलेला घराबाहेर हाकललं
'आप'चे 5 उमेदवार निश्चित
आपचे चार उमेदवार जवळपास निश्चित मानले जात आहेत. पंजाबमधून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी चढ्ढा यांच्याशिवाय प्राध्यापक संदीप पाठक यांच्या नावाचाही विचार केला जात आहे. याशिवाय, क्रिकेटपटू हरभजन सिंगही पंजाबमधून राज्यसभेचा उमेदवार असेल. तसेच लव्हली विद्यापीठाचे कुलपती अशोक कुमार मित्तल आणि संजीव अरोरा यांनाही उमेदवारी देण्यात आलीय.
Web Title: Aap To Nominate Raghav Chadha Cricketer Harbhajan Singh Sandeep Pathak For Upcoming Rajya Sabha Elections From Punjab
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..