पंजाबमध्ये सख्खे भाऊ आमनेसामने; एक 'आप'कडून तर दुसरा काँग्रेसकडून

पंजाबमध्ये सख्खे भाऊ आमनेसामने; एक 'आप'कडून तर दुसरा काँग्रेसकडून
Updated on

मजिठा (पंजाब) : पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाचा बालेकिल्ला असलेल्या मजिठा मतदारसंघात दोन भाऊच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. दोघांनीही स्वत:च्या विजयाचा दावा केला आहे. (Punjab Assembly Election 2022)

पंजाबमध्ये सख्खे भाऊ आमनेसामने; एक 'आप'कडून तर दुसरा काँग्रेसकडून
पंधरा दिवस 'या' राज्यात सार्वजनिक ठिकाणी वाजणार लतादीदींंची गाणी

मजिठा मतदारसंघात सुखजिंदरराजसिंग उर्फ लल्ली मजिठिया हे आम आदमी पक्षातर्फे निवडणूक लढवित असून त्यांचे धाकटे बंधू जगविंदरपालसिंग उर्फ जग्गा मजिठिया हे काँग्रेसतर्फे निवडणूक लढवित आहेत. अमृतसर जिल्ह्यातील या मतदारसंघावर २००७ पासून शिरोमणी अकाली दलाचे वर्चस्व असून विद्यमान आमदार विक्रमसिंग मजिठिया हेच १५ वर्षे येथील जनतेचे नेतृत्व करत आहेत. यंदाही त्यांनी मजिठा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, काँग्रेस नेते आणि पूर्व अमृतसर मतदारसंघातील उमेदवार नवज्योतसिंग सिद्धू यांनी आव्हान दिल्यानंतर मजिठिया यांनी मजिठामधील आपला अर्ज मागे घेत पूर्व अमृतसर मतदारसंघातून अर्ज भरला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून नवा आमदार निवडून येणार हे निश्‍चित असल्याने इतर पक्षाच्या उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, विक्रमसिंग यांनी त्यांच्या पत्नीलाच मजिठामधून निवडणूकीसाठी उभे केले असल्याने अप्रत्यक्षपणे ते या निवडणूकीत आहेतच.

पंजाबमध्ये सख्खे भाऊ आमनेसामने; एक 'आप'कडून तर दुसरा काँग्रेसकडून
Lata Mangeshkar : राज्यात दुखवटा; उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर

लल्ली मजिठिया यांनी गेल्याच महिन्यात काँग्रेसमधून बाहेर पडत आपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्याच धाकट्या भावाला उमेदवारी देत प्रतिशह दिला आहे. आपले थोरले बंधू गेल्या चार वर्षांपासून लोकांच्या संपर्कात नसल्याने इतके वर्ष त्यांच्यातर्फे मीच काम करत होतो, त्यामुळे जनता मलाच मतदान करणार, असा विश्‍वास जग्गा मजिठिया यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com