sidhu and channi
sidhu and channisakal

पंजाबमध्ये सत्ता राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान

पंजाबमध्ये अंदाजे ६४ लाख दलित, ५७ लाख हिंदू तर ५० लाखाच्या आसपास शीख-जाट मते आहेत. तीनच समाज पंजाबच्या राजकारणात निर्णायक आहेत.
Summary

पंजाबमध्ये अंदाजे ६४ लाख दलित, ५७ लाख हिंदू तर ५० लाखाच्या आसपास शीख-जाट मते आहेत. तीनच समाज पंजाबच्या राजकारणात निर्णायक आहेत.

चंडीगड - प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) व मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्यात सुरू असलेले शीतयुद्ध, प्रचार समितीचे प्रमुख सुनील जाखड यांची नाराजी आणि आपने निवडणुकीच्या तोंडावर पाडलेला आश्वासनांचा पाऊस यामुळे पंजाबची (Punjab) सत्ता राखण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर (Congress) आहे. या निवडणुकीत जात फॅक्टर निर्णायक ठरणार आहे.

पंजाबमध्ये अंदाजे ६४ लाख दलित, ५७ लाख हिंदू तर ५० लाखाच्या आसपास शीख-जाट मते आहेत. तीनच समाज पंजाबच्या राजकारणात निर्णायक आहेत. दलितांपैकी ४४ लाख शिख तर २० लाख हिंदू आहेत. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसने ४१ टक्के दलित मते मिळवल्याची माहिती आहे. गेल्या निवडणुकीत शिरोमणी अकाली दल व भाजपची आघाडी होती. त्यांना ३४ टक्के दलित मते मिळाली तर आपला १९ टक्के दलित मते मिळाली. यावेळी अकाली दल व भाजप वेगळे लढत असले तरी दलित मतांवर डोळा ठेवून उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या बसपशी आघाडी करण्यात अकाली दलाचे नेते प्रकाशसिंह बादल यशस्वी झाले. पंजाबच्या आजपर्यंतच्या निवडणुकीचा इतिहास बघितला तर दलित समाज नेहमीच काँग्रेससोबत राहिला आहे; पण यावेळची काँग्रेस अंतर्गतच परिस्थिती वेगळी आहे. चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केल्यापासून सिद्धू नाराज आहेत, त्यांनी उघडपणे ही नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे याच पदावरून जाखड हेही नाराज असल्याची चर्चा आहे.

sidhu and channi
यूपी, बिहारी भय्यांना राज्यात घुसू देऊ नका; CM चन्नींच्या विधानामुळे वाद

दृष्टिक्षेपात २०१७ ची निवडणूक

पक्षाचे नाव उमेदवार विजयी उमेदवार दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार

काँग्रेस ११७ ७७ ४१

आप ११२ २० २६

अकाली दल-भाजप ११७ १५ ६२

जातनिहाय मतदारसंख्या (टक्क्यांत)

दलित - २३.९

हिंदू - ३५

जाट शिख - ४१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com