Punjab : मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळानं घेतली शपथ; 10 आमदार झाले 'मंत्री' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Punjab Assembly Election

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला.

Punjab : मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळानं घेतली शपथ

पंजाबची राजधानी चंदीगडमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. यात 10 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतलीय. भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात एका महिला मंत्र्याचाही समावेश आहे. पंजाब राजभवनातील आयोजित कार्यक्रमात शपथ घेणार्‍या मंत्र्यांमध्ये आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) ज्येष्ठ नेते हरपाल सिंह चीमा हे प्रमुख आहेत. या नव्या सरकारमध्ये बलजीत कौर या एकमेव महिला मंत्री आहेत. याशिवाय हरभजन सिंह इटो, विजय सिंघला, लाल सिंह कात्रोचक, गुरमीत सिंह मीत हायर, कुलदीप सिंह धालीवाल, लालजीत सिंह भुल्लर, ब्रह्म शंकर आणि हरजोत सिंह बैंस यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतलीय.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या 10 आमदारांची नावं आणि छायाचित्रं ट्विटरवर शेअर केली आहेत. त्यात त्यांनी लिहिलंय, पंजाबचं नवं मंत्रिमंडळ आज (शनिवार) शपथ घेणार आहे. पंजाबच्या आप सरकारमध्ये सामील झालेल्या सर्व मंत्र्यांचं खूप-खूप अभिनंदन असं म्हणत मान यांनी पंजाबच्या जनतेनं आपल्या सर्वांवर खूप मोठी जबाबदारी टाकलीय, त्यांची सेवा करु असं आश्वासन दिलंय. तसेच पंजाबला प्रामाणिक सरकार देण्यासाठी आपल्याला दिवसरात्र मेहनत करावी लागेल, असंही ते म्हणाले.

Punjab Assembly Election

Punjab Assembly Election

हेही वाचा: 'केजरीवालांनी अण्णा हजारेंशी गद्दारी केली म्हणून आपचा जन्म झाला'

माहितीनुसार, शपथ घेतल्यानंतर मंत्री पदभार स्वीकारतील आणि आप सरकारची पहिली कॅबिनेट बैठक दुपारी होईल. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी बुधवारी मान यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिलीय. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत (Punjab Assembly Election) आम आदमी पक्षाला 117 सदस्यीय विधानसभेत एकूण 92 जागा मिळाल्या आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच पक्षाला 92 जागा जिंकता आल्या. तर, आपनंतर काँग्रेसला (Congress) सर्वाधिक 18 जागा मिळाल्या आहेत.

हेही वाचा: 'नरेंद्र मोदींनंतर भाजप भारतात टिकणार नाही, पण काँग्रेस कायम राहील'

Web Title: Punjab Cm Bhagwant Mann Cabinet Expansion Ceremony In Chandigarh Harpal Singh Cheema Dr Baljit Kaur Governor Banwarilal Purohit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top