पंजाब : VVIP ची सुरक्षा घटवली; शपथविधीपूर्वीच भगवंत मान अ‍ॅक्शनमोडमध्ये!

इतरही अनेक महत्वाचे निर्णय घेण्याचे संकेत मान यांनी दिले आहेत.
Bhagwant Mann
Bhagwant MannEsakal

चंदीगड : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वीच आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मान यांच्या निर्देशांनंतर राज्य शासनानं अनेक अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या (VVIP) आणि मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेला कात्री लावली आहे. यामुळं येत्या काळात राज्यात अनेक बदल दिसतील याची झलकचं त्यांनी दाखवून दिली आहे. (VVIP security reduced in Punjab Bhagwant Mann in action mode before swearing in ceremoney)

Bhagwant Mann
ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचं निधन

पंजाबमधील माजी आमदार, माजी मंत्री आणि अनेक व्हीव्हीआयपी व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था मागे घेण्याचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत. केवळ बादल कुटुंबीय ज्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानं सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. तर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि चरणजीत सिंग चन्नी यांना सोडून इतर सर्व काँग्रेस आणि अकाली दलाच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. तसेच अनेक माजी आमदरांची सुरक्षा मागे घेण्यात आली आहे.

Bhagwant Mann
"ते वकील तसा मी पण वकील, त्यामुळं...."; प्रवीण चव्हाणांच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर

तत्पूर्वी पंजाबच्या आगामी मुख्यमंत्र्यांनी शपथ घेण्यापूर्वीच भागवंत मान यांनी वेणुप्रसाद यांना आपला स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्त केलं आहे. वेणुप्रसाद हे सन १९९१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. भगवंत मान हे येत्या १६ मार्च रोजी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, आपच्या इतर आमदारांनाही कॅबिनेट मंत्र्याची शपथ देण्यात येणार आहे. यामध्ये विशेष बाब ही आहे की, शपथविधी समारंभ नवांशहर जिल्ह्यातील खटकरकला इथं आयोजित करण्यात आला आहे.

Bhagwant Mann
"मला आयफोनपेक्षा अँड्रॉइड स्मार्टफोन्स जास्त आवडतात"; असं का म्हणाले बिल गेट्स?

दरम्यान, पंजाबमधील विधानसभा निवडणुकीत ११७ जागांपैकी आम आदमी पार्टीनं ९२ जागा जिंकत बहुमत मिळवलं. तर काँग्रेसला केवळ १८ जागांवर समाधान मानावं लागलं. तर शरोमणी अकाली दलच्या खात्यात ३ जागा तर भाजपला २ आणि बसपाला केवळ १ जागेवर समाधान मानावर लागलं. तसेच एक जागा अपक्ष उमेदवारानं जिंकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com