Budget 2022: 'अर्थसंकल्प Damp Squib!' शशी थरूरांना म्हणायचंय तरी काय?

Union Budget Update: यंदाचा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी दिली आहे.
Shashi Tharur comment on Union Budget 2022
Shashi Tharur comment on Union Budget 2022Esakal

Union Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज 2022-23 या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्यांनी विविध घोषणा केल्या. दरम्यान काँग्रेस नेते (Corngress) आणि खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी प्रतिक्रिया देताना या बजेटमध्ये काहीच नसल्याचे म्हटले आहे.

"अत्यंत निराशाजनक, अपेक्षेपेक्षा खूपच सुमार दर्जा (damp squib)! या अर्थसंकल्पात काहीच नसल्याचे दिसून येत आहे. हा एक आश्चर्यकारक, निराशाजनक अर्थसंकल्प आहे. जेव्हा तुम्ही भाषण ऐकता तेव्हा मनरेगा, संरक्षण, जनतेला भेडसावणाऱ्या इतर कोणत्याही तातडीच्या प्राधान्यक्रमाचा उल्लेख नाही", अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार शशी थरूर दिली आहे. (Congress leader Shashi Tharoor has said that this year's budget is very disappointing.)

Shashi Tharur comment on Union Budget 2022
E-passport Updates in Budget 2022 | यावर्षापासून ई-चिप असलेले पासपोर्ट मिळणार; पाहा व्हिडीओ

आपण भयंकर महागाईचा सामना करत आहोत. मध्यमवर्गाला करात सवलत नाही. 'अच्छे दिन'चे मृगजळ आणखी दूर ढकलणारा हा अर्थसंकल्प आहे. 'अच्छे दिन' येण्यासाठी आम्हाला आणखी 25 वर्षे वाट पाहावी लागेल, अशी खोचक टीका काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com