बजेटबद्दल काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? किती गुण दिले?

Supriya Sule
Supriya Sulesakal

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर केला आहे. यावर आता वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या बजेटला अर्थशून्य बजेट ठरवलं आहे.

गरीबांची आणि महिलांची निराशा झाली आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. बजेटने खूप निराशा केली असून हे आभासी बजेट असल्याचं त्यांनी म्हटलंय. किती टक्के खर्च आरोग्यावर आणि किती टक्के खर्च शिक्षणावर याचा कसलाही उल्लेख नाहीये आणि पूर्णपणे दिशाहीन बजेट असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. या बजेटला काहीतरी गुण द्यायचे म्हणजे दोन गुण देईन, अशी खोचक टीकाही केली आहे.

Supriya Sule
चौथ्यांदा बजेट मांडून निर्मला सीतारामन यांनी केला असाही विक्रम

त्या म्हणाल्या की, मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं की गरीबांसाठी एक शब्दही नव्हता. खरंच जीडीपीच्या किती टक्के शिक्षणावर आणि आरोग्यावर केलाय, याची स्पष्टता त्या बजेटच्या भाषणामधून आली नाहीये. महिलांसाठी फक्त अंगणवाडीच्या उल्लेखाशिवाय दुसरं काहीच नव्हतं. हे दिशाहीन बजेट आहे. गरीबांसाठी आणि सामान्यांसाठी यात काहीच नाहीये.

याच सरकारचा डेटा असं सांगतोय की बेरोजगारी वाढतेय आणि हेच सरकार इतक्या नोकऱ्या मिळाल्याचं सागंताहेत, अशी द्विधा माहिती हे देत आहेत. या बजेटमधून पूर्णपणे निराशाच झाली आहे. बजेटला दहापैकी किती गुण द्याल, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, काहीतरी द्यायला पाहिजे म्हणजे दोन गुण देईन, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

Supriya Sule
बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळालं ते शोधूनही सापडणं अशक्य: अजित पवार

महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नाही - अर्थमंत्री

देशाला कररुपानं सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर अन्याय करण्याची परंपरा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पातही कायम राखली. केंद्रानं चालू आर्थिक वर्षात एकूण 2 लाख 20 हजार कोटींचा एकूण केंद्रीय जीएसटी वसूल केला. त्यातले तब्बल 48 हजार कोटी महाराष्ट्रातून वसूल करण्यात आले. या केंद्रीय जीएसटीच्या बदल्यात महाराष्ट्राला अवघे साडेपाच हजार कोटी रुपये परत मिळाले. निधीवाटपातल्या या अन्यायाचं प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पातही स्पष्टपणे दिसत असून अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं ते शोधूनही सापडत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com