
केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे फ्लॉप चित्रपट - संजय राऊत
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सडकून टिका केली आहे. हा अर्थसंकल्प (Union Budget) म्हणजे फ्लॉप चित्रपट असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. (Union Budget is flop movie Criticism from Sanjay Raut)
या बजेटमधून मध्यमवर्गीय आणि गरीबांना काय मिळालंय? हा अर्थसंकल्प म्हणजे भ्रामक, जुमला, गोलमाल आणि टाइमपास असून एक फ्लॉप चित्रपट आहे, अशा शब्दातं संजय राऊत यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर सडकून टीका केली.
आगामी लोकसभेसाठी विरोधकांची आघाडी बनवणार
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही गेल्या महिन्यापासून काम करत आहोत तसेच सर्वविरोधी पक्षांची स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहितीही यावेळी संजय राऊत यांनी दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेणार आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली.
Web Title: Union Budget Is Flop Movie Criticism From Sanjay Raut
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..