

Start Investing with Just ₹10 a Day: A Beginner’s Guide
sakal
-डॉ. वीरेंद्र ताटके, गुंतवणूक क्षेत्राचे अभ्यासक
प्रसिद्ध व्यवस्थापनतज्ज्ञ प्रा. सी. के. प्रल्हाद यांनी अनेक वर्षांपूर्वी ‘बॉटम ऑफ द पिरॅमिड’ ही संकल्पना मांडली होती. व्यवस्थापन व व्यवसाय क्षेत्रातील ही एक अत्यंत प्रभावी संकल्पना मानली जाते. एखादे उत्पादन सर्वदूर पोहोचवायचे असेल, तर त्याची खरेदीकिंमत कमीतकमी ठेवावी, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला ते उत्पादन आवाक्यातील वाटेल. एकदा त्या उत्पादनाचे फायदे लक्षात आले, की त्या व्यक्तीचा त्यातील रस वाढतो आणि तो नियमितपणे त्याचा अवलंब करतो. आपल्या देशात ही संकल्पना विविध व्यवसायांनी त्यांच्या उत्पादनासाठी यशस्वीपणे राबवली आहे.