
वसंत कुलकर्णी - ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
आदित्य बिर्ला सन लाइफ फ्लेक्सिकॅप फंड येत्या २७ ऑगस्ट रोजी २७ वर्षे पूर्ण करीत आहे. मागील २७ वर्षांत (२७ ऑगस्ट १९९८ ते ८ ऑगस्ट २०२५) फंडाने वार्षिक २१.१३ टक्के दराने परतावा दिला आहे. गेल्या दहा, पाच आणि तीन वर्षांच्या कालावधीत या फंडाने पॉइंट-टू-पॉइंट रिटर्ननुसार अनुक्रमे १३.१४ टक्के, २०.४३ टक्के आणि १६.७ टक्के परतावा दिला आहे. या कामगिरीमुळे या फंडाने फ्लेक्सिकॅप फंड गटात आघाडीच्या फंडांमध्ये स्थान प्राप्त केले आहे.