

Gold & Silver: Timeless Investment That Never Loses Its Shine
Sakal
-अमित मोडक, ज्येष्ठ कमोडिटीतज्ज्ञ
गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी जास्त कारणे आंतरराष्ट्रीय घडामोडींची आहेत. सर्वांत आधी आपण सोने-चांदीची भाववाढ गेल्या काही दिवसांत कशी होत आहे, या वाढीमागची कारणे आणि अखेरीस अशा वेळी गुंतवणूकदार म्हणून आपण नेमके काय करायला हवे, याविषयी जाणून घेऊ या.